- मदतीचे हात; मायेची फुंकर ! - TheAnchor

Breaking

August 18, 2019

मदतीचे हात; मायेची फुंकर !

पूरग्रस्तांपर्यंत खरी मदत पोहचली पाहिजे, झेप फाउंडेशनच्या प्रेरणा बलकवडे या ताइने ते केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव,अर्जुनवाड गावांना स्वत: जाऊन शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचवलीय, तसेच पूरग्रस्त बाधितांच्या जखमेवर मायेने ,आपुलकीने फुंकर घातली आहे. काही पूरग्रस्तांनी स्वतः वरील आपबिती सांगता सांगता अश्रृंना वाट मोकळी करुन दिली.



समता परिषद आणि भुजबळ नॉलेज सिटीतर्फे मदतीचा हात

भारतीय महात्मा फुले समता परिषद व मेट भुजबळ नॉलेज सिटी मुंबई व नाशिकच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी संकलित करण्यात आलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस पंकज भुजबळ यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी रवाना करण्यात आली.
 राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून मदत करण्याचे आवाहन राज्यभरातील समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलेले होते. त्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांसाठी मिनरल वॉटर, बिस्किट, अन्न पदार्थ, नवीन कपडे, चादरी, ब्लँकेट, तांदुळ, ज्वारी, गहू, ज्वारी असे धान्य, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तू तसेच विद्यार्थ्यासाठी वह्या आणि शालोपयोगी वस्तू इत्यादींचे तातडीने संकलन करून वाटप करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तसेच मेट भुजबळ नॉलेज सिटी मुंबई व नाशिकच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत जमा करण्यात आली. तसेच धुळे, पालघर, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यातूनही मदत जमा करण्यात आली आहे. या जमा केलेल्या सर्व सामग्रीचे पॅकेजिंग करून आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून आमदार पंकज भुजबळ, समता परिषदेचे पदाधिकारी व मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त, व्यवस्थापक, शिक्षक आदींच्या उपस्थितीत नाशिक येथून मदतीचे ट्रक रवाना करण्यात आले 


   मदतीचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी समता परिषदेच्या वतीने पाच टन कांदे, पाच टन बटाटे, पाच टन गहू, पाच टन तांदूळ यासह एक ट्रक पॅकिंग मिनिरल वॉटर, ५ हजार बिस्कीटची पाकिटे तर विद्यार्थ्यासाठी १० हजार वह्या इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. तर मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेची बॅग, वह्या, चित्रकला वही, कम्पास बॉक्स, कलर बॉक्स, पेन्सिल बॉक्स, पेन, वॉटर बॉटल आदीसह उपयोगी शैक्षणिक साहित्याचे १५०० कीट तयार करून  पाठविण्यात आले आहे.
 याप्रसंगी संस्थेचे विश्वस्थ दिलीप खैरे, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कैलास कमोद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषद शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, समता परिषदेचे कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, धनंजय भावसार यांच्यासह संस्थेचे सर्व इंन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापक, ट्रस्ट ऑफिस पदाधिकारी व स्टाफ याप्रसंगी उपस्थित होते.



रेडक्रॉस पूरग्रस्त उपक्रमास मदत

नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या सभासदांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने  मदत गोळा केली . इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखेच्या माध्यमातून ही मदत सांगली कोल्हापूर येथे पाठण्यात येणार आहे. यावेळी  गोळा करण्यात आलेल्या  संसारोपयोगी वस्तू ,  स्टेशनरी, नवीन कपडे, अंथरूण-पांघरूण आदी साहित्य आणि  ३१ हजार रुपयांचा धनादेश नाशिक रेडक्रॉसचे सचिव मेजर  पी. एम. भगत यांना संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी नाशिक रेडक्रॉस चे डॉ. प्रतिभा औंधकर , डॉ.सुनिल औंधकर ,शशिकांत शर्मा, चंद्रकांत गोसावी, दिलीप जाधव आदी उपस्थित होते. याहीपुढे रेडक्रॉस च्या विविध सामाजिक उपक्रमात आमच्या संघटनेचे सक्रीय योगदान राहील असे  आश्वासन दशपुते आणि पदाधिकाऱ्यांनी दिले.  उपक्रम यशस्वितेसाठी संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते यांच्यासह उपाध्यक्ष  महेंद्रभाई पटेल, सहसचिव सुरेशशेठ मंत्री,  एकनाथ अमृतकर, संचालक  अरविंद दशपुते,  अरुण जातेगावकर, भिकालाल कोठावदे,  प्रभाकर गाडे,  महेंद्रभाई पटेल (एमडी), संतोष राय, अशोक सोनजे, विजय काकड , हेमचंद्र पांडे प्रयत्नशील होते .