भिंत खचली चुल विझली होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पानी थोडे ठेवले''
महापुरानंतर विदारक व काळजाला वेदना देणारी परिस्थिती आहे, त्याच्याशी साम्य दर्शवणाऱ्या
कुसुमाग्रज यांच्या 'फक्त लढ म्हणा' या कवितेच्या पंक्ती मनात लागलीच तरळल्या. महापुराला आता आठोडा झालाय. पुराचे पानी अद्याप काही ठिकाणी ओसरले नसल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.विशेष करुन पूराने वेढलेल्या ग्रामीण भागात पूरग्रस्तांची उपासमार तसेच रोगराईच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची भिती आहे. प्रथम कोल्हापूर, सांगलीकरांसमोर रोगराई आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान आहे.प्रशासनासह दानशूर व्यक्ती संघटना मदत करीत आहेत.
"संसार मोडून पडला तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूणी फक्त लढ म्हणा!"
महामार्गावरील पानी ओसरू लागल्याने हळूहळू कोल्हापूर शहर पूर्वपदावर येत आहे.दूध, इंधन, गॅस, दैनंदिन गरजेच्या वस्तू पोहचत आहेत.पुरात अनेकांचा संसार वाहून गेलाय त्यामुळे शिधा शिजवण्यासाठीची भांडी आणी धान्य भरडणाऱ्या गिरण्या सुस्थितीत असण्याची शक्यता नाही, त्यामुळे तयार अन्नाची पाकिटे पोहचते करावे लागतील. कोल्हापूर ,सांगलीतील लोक आणी सामाजिक संघटना त्यासाठी कामाला लागल्याय. महाराष्ट्रातील कानाकोप-यातून वैद्यकीय आणी इतर मदतीचा ओघ सुरू आहे. तो जेथे गरज आहे अशा पूररेषेतील ग्रामीण भागात पोहचते करण्याला प्राधान्य दयावे लागेल, संकटातून उभे राहण्यासाठीची धडपड पुरग्रस्त करीत आहेत, त्याच्या जिद्दीला दाद द्यावी लागेल, तसेच त्यांचे मनोबल उंचावून पायावर उभं करण्यासाठी आपल्या सर्वाना त्यांचा आधार बनवा लागेल.
स्वच्छतेसाठी दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी 1 कोटीची तरतूद; औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
महापुरानंतरचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे जेष्ठ पत्रकार शिवराज काटकर आणी काही सामाजिक कार्यकर्त्यानी शिर्डी संस्थाने दिलेल्या 10 कोटी निधीतून काही रक्कम रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेसाठी वापरावी याकरिता शिर्डी संस्थानकडे प्रयत्न चालविले होते ते यशस्वी झाले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने 10 कोटी मुख्यमंत्री निधीला मंजूर करतानाच सांगली कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 1 कोटी स्वच्छतेसाठी खर्चाला देण्याचे आपले मागणे मान्य केले आहे, यामध्ये खर्चाबाबत आक्षेप घेणारे पिटिशनर यांनी ही चांगली भूमिका घेतली, ज्येष्ठ पत्रकार माधव ओझा यांनीही साथ दिल्याने. आता सांगली कोल्हापूर दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर आजच 1 कोटी जमा होतील. तो फक्त स्वच्छतेवर खर्च करायचा आहे आणि 10 आठवड्यात खर्चाचे अहवाल औरंगाबाद खण्डपीठाला द्यायचे आहेत. एका सकारात्मक कार्याला हाक दिली आणि साईबाबा पावले याचा खूप आनंद आहे. संस्थानचे पदाधिकारी, अधिकारी, न्यायालय आणि पिटिशनर संदीप कुलकर्णी, संजय काळे, माधव ओझा या सर्वांचे आम्ही सांगली, कोल्हापूरकर ऋणी आहोत असे काटकर यांनी सांगितले
दिगंबर मराठे, नाशिक