महापूरामुळे कोल्हापुर आणि सांगली भागामध्ये जिवीत आणि वित्तहानी झालेली आहे. तेथील पूरग्रस्त बांधवांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यांच्या वेदना समजून घेत पुराने दिलेल्या जखमांवर मायेची फुंकर घालता यावी म्हणून नाशिकमधील महिला भगिनीं ही सरसावल्या आहे. सांगली-कोल्हापूरकडे मदतीचा ओघ वाहत असतांना पूरग्रस्तांसाठी “झेप फाऊंडेशन”तर्फे रॅली काढून मदत जमा करण्यात आली. राखी पोर्णिमेच्या दिवशी पुरग्रस्त बांधवांना ही मदत पोहचेल.
महापूरामुळे नाशिक गोदाकाठचे गावे सावरली पण कोल्हापुर आणि सांगली भागामध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून तिथल्या लोकांना नव्याने संसार उभा करणं कठीण झालं आहे, मात्र त्यांची पुन्हा उभे राहण्याची जिद्द, धडपड बघून त्यांना खंबीर साथ देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी नव्यानेच स्थापन केलेल्या “ झेप फाऊंडेशन” या संस्थेतर्फे मदत जमा अभियान हाती घेत साथ देण्याचा निश्चय केला. काही महिला भगिनींना सोबत घेत घरोघरी जात पुरग्रस्त बांधवांसाठी मदत मागितली, नागरिकांनी या कार्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला. ‘झेप फाऊंडेशनच्या’ वतीने धान्य, तेल, कपडे, चटाई-ब्लॅकेट, पाणी बॉटल, औषध, बिस्कीट, स्नॅक्स, पापड,सॅनेटरी पॅड, साबण, मेणबत्ती आदि मदतीच्या वस्तुंची पॅकिंग करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे व विशाल बलकवडे स्वत: सांगली ग्रामीण गावांना जाऊन ही सर्व मदत गरजू कुटुंबाना राखी पोर्णीमेच्या दिवशी सुपुर्द करणार आहेत.
मदतीसाठी सरसावलेले हात
तसेच भगूरचे नागरिक, नाशिक फोरम, अग्रवाल महिला मंडळ, रा. काँग्रेस देवळाली कॅम्प, विरा फुड्स, ॲक्वा शुअर वॉटर, सिमला नमकीन प्रा. ली. ज्योती वाघचौरे, अक्षय शेळके, कैलास भोर, संतोष सोनवणे, सायरा शेख, विशाल नागरे, गायत्री झांजरे, श्रीकांत सोनवणे, साईनाथ पंडोरे, रिझवान शेख, साहिल मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.