- इडी आणी 'राज'कारण - TheAnchor

Breaking

August 20, 2019

इडी आणी 'राज'कारण

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने दादर येथील कोहिनूर मिल म्हणजे आताचे कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी राज यांना 22  ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश आहेत.
Image source -google|image by wikipedia
                                             
त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोहिनूर मिल राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनी खरेदी केली. यात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शीयल सर्विसेस लि. या कंपनीने देखील मोठी गुंतवणूक केली होती,  त्यामध्ये  कंपनीला तोटा सहन करावा लागल्याने कंपनीने काढता पाय घेतला. त्यापाठोपाठ राज यानी ही आपली हिस्सेदारी विकल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोहिनूर मिलमध्ये जे व्यवहार झाले ते व्यवहार ईडीला तपासायचे असल्याचे बोललं जाते. ईडी ही केंद्रिय स्तरावरील आर्थिक घोटाळे आणी व्यवहार तपासायचे काम  करते. ही संस्था केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांचा आहे. असेच आरोप काँग्रेस सत्तेवर असतांना ही झालेत. 
Image sourse- google|image by wikipedia
                                      

ईडीच्या टाइमिंगवर प्रश्नं?

केंद्रात सन 2004 आणी 2014 ला भाजपा सरकार होते, त्यावेळी का कारवाई केली नाही असा सवाल ही विरोधीपक्ष आणि राज समर्थकांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत नोटबंदी, जीएसटी,  प्रत्येकी 15 लाख देण्याच्या घोषणांचा समाचार घेतांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी अमित शहा यांच्यावर राज यांनी चौफेर टिका केली होती, ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधकांना एकत्र करण्याचे काम करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ही त्यांनी भेट घेतली होती. ईव्हीएम प्रश्नी सातत्याने भूमिका ते घेत असून रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्यानेच नोटीस पाठवली असून याद राखा चौकशी कोहिनूर मिलची नसून कोहिनूर हि-याची करताय अशा आशयाचे पोस्टर ही कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर झळकवायला सुरुवात केलीय. लोकसभा निवडणुकीच्या काळात तृणमूल काँग्रेस आणी भाजपा यांच्यात देखील वादंग झाला होता

                                                      सोशल माध्यमातील वायरल पोस्ट

                                                                    फोटो- व्हाट्सअप 

भाजप-मनसे कलगीतुरा रंगणार

आगामी निवडणुकीत मनसे आणी भाजपा यांच्यातच कलंगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसताय. त्याचा हा ट्रेलर तर नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे,सद्या भाजप सावध भूमिका घेत आहे. मात्र मनसे कार्यकर्ते सोशल माध्यमात आक्रमक भूमिका मांडत आहे. राज ठाकरे यांनी मात्र  22 तारखेला ईडी कार्यालयाबाहेर गर्दी न करता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे .