- विक्रम थांबले, इस्रो नाही ! - TheAnchor

Breaking

September 8, 2019

विक्रम थांबले, इस्रो नाही !

 चंद्रयान मोहिमेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधले आहे. त्यामुळे भारतासह  संपूर्ण जगाला या मोहिमेविषयी कुतुहूल होते. 22 जुलैला चंद्रयान-2 मार्क।।। जीएसएलवी प्रक्षेपण यानाद्वारे चंद्रमोहिमेला प्रारंभ झाला. त्यानंतर 20 ऑगस्टला यशस्वीपणे यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. दोन दिवसानंतर म्हणजे 22 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्र यानावरील कॅमेऱ्याने टिपले, 26 ला दुसरे छायाचित्र घेतल्यावर पुढील प्रवासाला सुरुवात झाली. २ सप्टेंबर रोजी विक्रम लँडर चंद्रयानापासून (रॉकेट) वेगळे झाले
chandrayan2-mission-isro
   चंद्राभोवती 100 किमी x 30 किमी अंतरावर विभक्त करण्याचा इस्रोचा प्रयत्न होता,  गुंतागुंतीचे सर्व टप्पे सुरळीत पार करत असतांना  7 सप्टेंबरला पहाटे 2 वा. विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण भागावर उतरणार होते, मात्र पहाटे 1. 55 वा. लँडरचा इस्रोच्या ग्राउंड  स्टेशनशी संपर्क तुटला आणि सर्वच जण हताश झाले. यामोहिमे प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी शास्त्रज्ञ आणि तेथील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील निराशा बघून त्याना खचून न जाता यशपायश चालू असते तुम्ही देशासाठी चांगले काम करत आहात मी तुमचे अभिनंदन करतो तसेच मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही प्रयत्न करत रहा अशा शब्दात सर्वांचे मनोबल वाढवले. मात्र इस्रोची ही मोठी कामगिरी मानली जात आहे.  चंद्राच्या पृष्ठभावरील नवीन छायाचित्रे उपलब्ध झाल्याने चंद्राच्या नव्या अध्ययनासाठी ती महत्वाची आहे. गेले 45 दिवस इस्रोचे सायंटिस्ट चंद्र मोहिमेच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. विक्रमचा संपर्क जरी तुटला असला तरी इस्रो  संपर्कासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहे.
isro-mission-chandrayan

           चंद्रयानाचा प्रवास आणि उद्देश

 चंद्रयान 2 ही मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात पूर्ण धाडसाने उतरवण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे.  जिथे अद्याप कोणताही देश आलेला नाही - म्हणजेच चंद्राचा दक्षिण ध्रुवीय प्रदेश.  त्याचा उद्देश चंद्राविषयी माहिती गोळा करणे आणि  नवीन गोष्टीचा शोध लावणे आहे जेणेकरून भारताला तसेच संपूर्ण मानवतेला त्याचा फायदा होईल.  या चाचण्या आणि अनुभवांच्या अनुषंगाने चंद्र मिशनमध्ये नवीन तंत्रज्ञान अवलंबण्यात आले, प्रयत्न यशस्वी झाले असते तर चंद्राच्या पृष्ठभागावर रॉकेट उतरवणारा भारत चौथा देश ठरला असता. यापूर्वी इस्रोने चंद्रयान 1 मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यात चंद्रावर पाणी असण्याचे पुरावे हाती आले होते. त्यामुळे इस्रोच्या टीमला या मोहिमेविषयी पूर्ण खात्री होती. यापूर्वी इस्त्रायलने देखील लँडिंगचा प्रयत्न केला होता तो अयशस्वी झाला होता.
mission-chandrayan2-isro

                       चंद्रयानचे महत्व

चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवाजवळील एका स्थानाजवळ उतरुन वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी ही मोहिम महत्वपूर्ण होती.  मोहिमेआधी 15 जुलै 2019 रोजी, इस्रोला एक तांत्रिक दोष सापडला, इस्रोच्या पथकाने यावर काम केले आणि 24 तासात त्रुटी शोधली.  त्यात दुरुस्ती करत योग्य दिशेने दीड दिवस आवश्यक त्या चाचण्या घेण्यात आल्या.  आज इस्रोने आपल्या कामात चमकदार यश संपादन केले. चंद्रयान -2 च्या ऑन-बोर्ड प्रोपल्शन सिस्टमचा वापर करून अनेक कक्षा चालवल्या गेल्या,  हे टप्प्याटप्प्याने यान चंद्राच्या जवळ प्रवास करू शकले.
      चंद्रयान -२ चे ध्येय म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर सरकणे, चंद्रावर सहज लँडिंग करण्यासह एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत चंद्र मिशन क्षमतांसाठी मुख्य तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे.  विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, या मिशनचे लक्ष्य स्थलाकृति, खनिजशास्त्र, पृष्ठभाग रासायनिक पोषण, थर्मो-फिजिकल वैशिष्ट्ये आणि वातावरण यांच्याद्वारे चंद्राबद्दलचे आपले ज्ञान आणखी वाढविणे आहे, ज्यायोगे चंद्र आणि त्याच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीविषयी आपली समज वाढविणे होय.

   पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर आणि चंद्राच्या प्रभावाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर, अंतराळ यानाची गती कमी करण्यासाठी चंद्रयान -2 ची ऑन-बोर्ड प्रोपल्शन सिस्टम उडविली गेली.  त्यामुळे वाहनास चंद्राभोवती प्रारंभिक कक्षापर्यंत पोहोचण्यास मदत झाली, त्यानंतर रोव्हर लँडरच्या बाहेर येईल आणि 1 चंद्राच्या दिवसासाठी चाचणी घेईल, जी पृथ्वीवरील 14 दिवसांच्या समतुल्य आहे.  लँडरचे मिशन वय देखील एक चंद्र दिवस आहे.  ऑर्बिटर एक वर्ष कालावधीसाठी आपले ध्येय चालू ठेवेल असे नियोजन होते.
Isro-mission-chandrayan2-

                      जीएसएलवी(रॉकेट)

जीएसएलव्ही  मार्क तिसरा हा इस्रोने विकसित केलेला तीन-चरणांचे प्रक्षेपण रॉकेट आहे.  रॉकेटमध्ये दोन सॉलिड स्ट्रॅप-ऑन, एक कोर फ्लुईड एम्प्लीफायर आणि क्रायोजेनिक अपर स्टेज असतात.  जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (जीटीओ) मध्ये 4-टन श्रेणी उपग्रह किंवा लो-पृथ्वी कक्षामध्ये सुमारे 10 टन वजनाचे उपग्रह वाहून नेण्यासाठी हे रॉकेट डिझाइन केले आहे.चंद्रयान -२ ही चंद्रावरील भारताची दुसरी मोहिम आहे.  यात पूर्णपणे स्वदेशी ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) आहे. विक्रमच्या आत रोव्हर ठेवला आहे.

ऑर्बिटर

ऑर्बिटरचे लिफ्ट वजन सुमारे 2,369  किलो ग्राम होते तर लँडर व रोव्हरचे वजन अनुक्रमे 1,477 किलग्राम होते.  आणि 26 किलो.  होता.  रोव्हर 500 मीटर (अर्धा किमी) पर्यंत प्रवास करू शकतो आणि कार्य करण्यासाठी सौर पॅनेलद्वारे तयार केलेल्या विद्युत उर्जावर अवलंबून असेल.चंद्रयान -२ मध्ये चंद्राच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दल अधिक तपशीलवार समज विकसित करण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयत्न शील आहेत. ऑर्बिटरकडे 8 पेलोड आहेत, लँडर 3 पेलोड आणि रोव्हरला दोन पेलोड आहेत.  याव्यतिरिक्त लँडरमध्ये एक निष्क्रिय प्रयोग समाविष्ट आहे.  ऑर्बिटर पेलोड 100 किमी.  एक कक्षाकडून रिमोट-सेन्सिंग निरीक्षणे आयोजित करेल तर लँडर आणि रोव्हर पेलोड लँडिंग पॉईंट जवळ स्थित-मोजमाप करेल.

  चंद्रयान -२ अभियानची  वैशिष्ट्ये म्हणजे अंतराळ यानाकडून आरोग्यविषयक माहिती आणि वैज्ञानिक डेटा मिळवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतील.  हे अंतराळ याना रेडिओ कमांड देखील पाठवेल.  चंद्रयान -२ च्या भूभागामध्ये भारतीय दीप अवकाश नेटवर्क, अंतराळ यान नियंत्रण केंद्र आणि भारतीय अवकाश विज्ञान डेटा केंद्र समाविष्ट आहे. आजच्या चंद्रयान -२ ची यशस्वी सुरुवात ही आव्हानात्मक मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही मोहिम पाहण्यासाठी श्रीहरीकोटा येथील प्रेक्षक गॅलरीमध्ये देशभरातील विद्यार्थी, अभ्यासक, पत्रकार यांची ही मोठी गर्दी होती. सोशल माध्यमातून या मोहिमेला पाठिंबा देत शास्त्रज्ञ व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले असून विक्रम लँडर थांबले इस्रो नाही अशा शब्दात नेटीजन्सनी विश्वास व्यक्त केला.

      ऑर्बिटरला लँडर विक्रम सापडला

ऑर्बिटरने ग्राउंड स्टेशनशी संपर्क गमावल्यानंतर प्रत्येकाला वाटले की हे मिशन अयशस्वी झाले आहे, परंतु तसे नाही लँडरशी संपर्क साधल्यानंतरही, ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेमध्ये  फिरत आहे, महत्वाची गोष्ट तो फिरत होता आणि चित्र घेत होता. विक्रम एक वर्ष पर्यंत काम करेल. मात्र अलीकडेच, ऑर्बिटरने चंद्राच्या कक्षात विक्रम लँडरचा शोध घेतला आणि त्याचे चित्र पृथ्वीवरील अंतराळ स्थानकावर पाठविले.
     या घटने इस्रोच्या वैज्ञानिकांमध्ये पुन्हा उत्साह भरला आहे.  न्यूज एजन्सी एएनआयशी झालेल्या संभाषणात के सीवन म्हणाले, विक्रम ज्या ठिकाणी आहे त्याचे छायाचित्र मिळाले आहे. ऑर्बिटरने लँडरचा फोटो पाठविला आहे, आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत पण तीन दिवसांत अचूक माहिती उपलब्ध होणार नाही.  तर हे स्पष्ट आहे की अद्याप हे अभियान चालू आहे.  
         दरम्यान विक्रम चंद्रावर उतरला आहे. तो एका बाजूने झुकल्याचे दिसते त्याच्याशी संपर्क साधून सरळ उभे करण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे. 14 दिवसांच्या उजेडात विक्रमला सर्व काम आटोपायचेय, त्यानंतर पुढील 14 दिवस अंधार असेल म्हणून इस्रोची टीम सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यासाठी अमेरिकेची स्पेस एजेंसी नासा देखील इस्रोला सहकार्य करत आहे

लँडरशी संपर्क तुतण्याच्या कारणांचे विश्लेषण एक राष्ट्रीय समिती करणार


ऑर्बिटरचे सर्व पेलोड चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत.  ऑर्बिटर पेलोडसाठी प्रारंभिक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत असे इस्रोतर्फे सांगण्यात आले आहे. सर्व ऑर्बिटर पेलोडची कामगिरी समाधानकारक आहे. इस्रो तज्ञांची एक राष्ट्रीय स्तरावरील समिती लँडरशी संप्रेषण अर्थात संपर्क तुटण्याच्या कारणाचे विश्लेषण करण्याचे काम देखील करणार आहे. तसेच ऑर्बिटर एक वर्ष नव्हे तर त्यात पुरेसे इंधन असल्याने सात वर्षापर्यत चंद्रावर राहू शकणार आहे. हार्ड लँडिंगमुळे विक्रम लँडर 200 किमी प्रतितास वेगाने चंद्रावर आदळल्याचा अंदाज आहे, त्यामुळे चंद्रावर तो तिरप्या स्थितीत दिसत असल्याचे छायाचित्र ऑर्बिटरने घेतले होते. मात्र त्यात असलेले आठ पेलोड सुस्थितीत काम करत आहे. त्याच्या एंटीनाचे नुकसान झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी आल्या. आता चंद्रावर रात्र आहे. चंद्रावरील 1 दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबर आहे. दिवसाच इस्रोला सर्व प्रयोग करणे आणि अभ्यास करणे शक्य होते, मात्र आता लँडर अंधारात गेला की त्याच्याशी संपर्क साधने जवळपास अशक्य आहे. कारण त्यावेळी चंद्रावर  -180° सेल्सियस पर्यत तापमान असते, त्या तापमनात टिकाव धरेल अशा प्रकारची त्याची रचना नसल्याने त्याच्याशी संपर्क होणे अवघड आहे.
Isro Chief k Sivan
       Image sourse- gallery | Images by Isro

दिगंबर मराठे