नाशकात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो, गणपतीचा निरोप देखील हा या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे महानगरपालिकेच्या "गो ग्रीन" या संदेशाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने या गणेश विसर्जनाला बघायला मिळाली. संभाजी स्टेडियममध्ये मनपासोबत नागरिक आणि सामाजिक संस्थानी भागीदारी करत सर्व गणेश भक्तांच्या सोयीकरीता विसर्जन टाक्या व निर्माल्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. फीडिंग इंडिया नाशिक संस्थेने त्याठिकाणी प्रसाद व इतर खाद्यपदार्थ वाया जाऊ नये म्हणून ते जमा करण्यासाठी स्टॉल लावला होता.
फीडिंग इंडियाचे प्रसाद कुलकर्णी, निशा देशमुख, मंगल दंगल, अंजली कुलकर्णी, अजय कणव, शहराध्यक्ष पूनम कणव या विसर्जनाच्या दिवशी दिवस भर मुसळधार पावसात ही सेवा करत कार्यक्रमाला उपस्थित होत्या मोदक,नारळ, खारपाट, पोळी, भात यांचे मिश्रण असलेले सर्व प्रसाद एकत्रित केला आणि प्रसादाचे सर्व अन्न हे वाया न घालवता कामटवाडी झोपडपट्टी, मुंबई महामार्गावर आणि 'शरण' जनावरांच्या निवाऱ्याला दिले. तसेच भुकेल्या व गरजू लोकांना अन्न दिल्याने त्यासर्वांचे आशीर्वाद मिळाल्याचे समाधान ही त्यांना लाभले. हा उपक्रम फीडीग इंडिया नाशिकचा वतीने होता, ज्याने १५००० हून अधिक भुकेल्या लोकांना अन्न पुरविण्याचे कार्य केले आहे. नाशिकमध्ये फीडींग इंडियाचे अन्नाचे संकलन व वितरण यासाठी ७० पेक्षा जास्त स्वयंसेवकही आहेत ज्याना "हंगर हिरो" असे म्हटले जाते.

![]() |
फीडिंग इंडियाची नाशिक टीम |
फीडिंग इंडियाबाबत
फीडिंग इंडियाची स्थापना 2014 मध्ये 24 वर्षीय अंकित क्वात्रा यांनी केली होती. देशभरात 82 पेक्षा जास्त शहरात संस्थेचे काम चालते,21,500 पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत. 25 मिलियन लोकांना जेवन पुरवले आहे. फीडिंग इंडिया ही भूक, कुपोषण आणि अन्न-अपव्यय निर्मूलनाच्या उद्देशाने काम करणाऱ्या देशातील सर्वात मोठया नफा न कमवणाऱ्या संघटनांपैकी एक आहे. फीडिंग इंडियाचे स्वयंसेवक हे व्यक्ती, समुदाय, विवाहसोहळे, रेस्टॉरंट्स आणि कॉर्पोरेट कॅफेटेरियांकडून अधिकांश जेवण मिळवण्याच्या दिशेने कार्य करत आहेत, तसेच नियमित गरजूंसाठी ताजे शिजलेले जेवण तयार करुन पुरवले जाते. त्यांनी संवेदनशील स्वयंसेवक 'हंगर हीरोच्या' मदतीने शून्य नासाडी,उपासमार संपवणे, गरजूना अन्न पुरवठा, असमानता कमी करणे, स्वच्छ भारत, हॅपी फ्रीज, शिक्षण, पर्यावरण, शांती प्रेम सद्भावना आदी उद्देश आणि प्रमुख कार्यक्रमांसह नेत्रदीपक कार्य सुरू आहे.
![]() |
अंकित क्वात्रा, संस्थापक फीडिंग इंडिया |
![]() |
फीडिंग इंडिया नाशिकचे हंगर हीरो |
भारतातील भूकस्थितीवर एक नजर
दरवर्षी ग्लोबल हंगर इंडेक्स जाहिर केली जाते. आयरलैंडची कंसर्न वर्ल्डवाइल्ड आणि जर्मनीची वेल्धुन्गेरीलफे या दोन बिगर सरकारी संस्था संयुक्तपणे सूची जाहिर करत असतात, तीन मुख्य मुद्यावर अहवाल असतो, 5 वर्षांखालील मुलांमध्ये वाया जाणारे आणि स्टंटिंगचे प्रमाण, 5 वर्षांखालील बालमृत्यु दर, आणि लोकसंख्या कुपोषण प्रमाण याबाबींचा विचार केला जातो.
यंदाची सूची पुढील महिन्यात ऑक्टोबरला येईल, सन 2018 मधील सूचीत 119 देेेशांपैकी भारत 103 क्रमांकावर आहे. एफएओच्या अंदाजानुसार, 'द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड, 2019 'च्या अहवालात भारतात 194.4 दशलक्ष लोक कुपोषित आहेत तसेच, 15 ते 49 वर्षांच्या 51.4% स्त्रिया या अशक्त आहे (अनेमिया ग्रस्त) भारतात पाच वर्षांखालील 37.9% मुले कमी वजनाची आहेत (त्यांचे वय खूपच लहान आहेत), तर 20.8% वाया जाण्याने ग्रस्त आहेत, म्हणजे त्यांचे वजन व उंची कमी आहे. त्यामुळे अतिसार, न्यूमोनिया आणि मलेरियासारख्या सामान्य बालपणातील आजारांमुळे कुपोषित मुलांचा मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो.

भारत अन्न उत्पादन आणि अन्न नासाडी
१.3 अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये गेल्या दोन दशकांत प्रचंड वाढ झाली आहे. दरडोई वापर 3 पट वाढला आहे. त्याचप्रमाणे अन्नधान्याचे उत्पादन जवळपास 2 पट वाढले आहे.भारत लोकसंख्येच्या आहारासाठी पुरेसे अन्न तयार करीत असूनही, मोठ्या संख्येने लोकांना, विशेषत: महिला आणि मुलांपर्यंत खाद्यापर्यंत पोचवण्यात असमर्थ आहे. भारतात भव्य लग्न सोहळे, मोठया पार्टया, रेस्टोरेंट आदी ठिकाणी मोठया प्रमाणात अन्न वाया जाते. काही संवेदनशील नागरिक वेळीच ते अन्न गरजूपर्यंत पोचवतात मात्र त्याचे प्रमाण अल्प आहे अन्यथा अन्न वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. एका सामाजिक संस्थेच्या माहितीनुसार 20 % लोक रात्री उपाशी झोपतात. एकीकडे अन्नधान्यात स्वयंपूर्णता तर दुसरीकडे एका मोठया जनसंख्येची उपासमार असे विरोधी चित्र भारतात बघायला मिळते. संयुक्तराष्ट्राच्या एका अहवालानुसार 40% अन्न उत्पादन वाया जाते,त्यात 21% गहू या पिकाचा समावेश आहे.
जग: अन्न नासाडी,अन्न कचरा तथ्य
असे अन्न जे अन्न स्टोअर किंवा खाद्यपदार्थ स्टॉलवर विकत घेतले जात नाही, घरी, रेस्टॉरंट्स आणि कॅफेटेरियसमध्ये खाल्ले जात नाही. त्याला अन्न कचरा असे म्हणतात. दुसरीकडे एक असा अंदाज आहे की दर वर्षी मानवी वापरासाठी जगात उत्पादित जवळजवळ एक तृतीयांश अन्नाचा नाश होतो किंवा वाया जाते. 40 टक्के फळे, भाज्या आणि 30 टक्के तृणधान्ये याचा समावेश होतो. अकार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनामुळे गमावली जातात. त्या ग्राहकांसाठी बाजारात पोहोचत नाहीत.
खाद्यपदार्थांचे नुकसान होण्याचे प्रमाण कापणीच्या वेळी आणि कापणीनंतर हाताळणी दरम्यान, वितरण आणि खपवण्याच्या टप्प्यात बऱ्याच अन्नाची नासधूस होते किंवा वाया जाते. अतिरिक्त उत्पादन, नवीन उत्पादने सादर करणे, लेबलिंग त्रुटी किंवा अन्न टिकवता न येणे, पडून असलेले अन्न, व्यवसायाच्या गोदामांमध्येही काही अन्न वाया जाते. किंवा वितरण नेटवर्कमधून वेळेवर मागे घेतलेले, अशा सर्वच अन्ना बाबत परिस्थिती पूर्ववत करायची असेल तर त्या साखळीला किंवा त्या लोकांना पुनर्निर्देशित करून ते अन्न वाचवले जाऊ शकते. अन्नासाठी वापरलेले 25 % पानी वाया जाते. त्यात आर्थिक तसेच इतर श्रम देखील वाया जातात.

संयुक्त राष्ट्राची चिंता आणि कृती आराखडा
दर वर्षी, जगात आपण तयार केलेले सुमारे 1/3 अन्न नासते किंवा वाया जाते. विकसनशील देशांमध्ये अन्नाचा(40%) मोठा हिस्सा कापणी किंवा प्रक्रियेच्या टप्प्यावर गमावला जातो. याला अन्नाचे नुकसान म्हणतात. विकसनशील देशांमध्ये, समान टक्केवारी (40%) ग्राहक किंवा किरकोळ टप्प्यावर गमावले जाते, अन्नाची हानी आणि कचऱ्यासंदर्भात जगभरात सुधारण्यासाठी बराच वाव आहे.J
आपण अशा सवयी तयार केल्यात की ज्यामुळे जगाला हानी पोहचू शकते. त्याने आपल्या नैसर्गिक संसाधनांवर अतिरिक्त ताण पडतो. जेव्हा आपण अन्न वाया घालवितो तेव्हा आपण श्रम, पैसा आणि मौल्यवान संसाधने (जसे की बियाणे, पाणी, चारा इ.) वाया घालवितो, वाहतुकीत जाणाऱ्या साधनांचा उल्लेख करत नाहीत त्याचाही परिणाम आहेच. थोडक्यात, अन्न वाया गेल्याने ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन वाढते आणि हवामान बदलामध्ये हातभार लागतो.
आपण आपल्या सवयी बदलू शकतात. आपण काही सोप्या गोष्टी येथे करू शकतो. लहान लहान भाग घ्या किंवा रेस्टॉरंटमध्ये मोठे डिशेस सामायिक करा. मागे काहीही करू नका - आपल्या उरलेल्या दुसर्या जेवणासाठी ठेवा किंवा त्या वेगळ्या डिशमध्ये वापरा. आपल्याला आवश्यक असलेली केवळ खरेदी करा - खरेदीसह स्मार्ट व्हा. आपल्याला काय हवे आहे याची एक सूची बनवा आणि त्यास चिकटून राहा. आपण वापरण्यापेक्षा अधिक खरेदी करू नका. पूर्वग्रह बाळगू नका - "कुरूप" किंवा अनियमित आकाराचे फळे आणि भाज्या खरेदी करा, आपल्या फ्रीजची चाचणी घ्या - 1 ते 5 डिग्री सेल्सिअस तापमानात अन्न साठवून घ्या ताजे अन्न घ्या, प्रथम - आधीचे खरेदी केलेले उत्पादन वापरण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा आपण आपले फ्रीज आणि कपाटे यात स्टॉक कराल तेव्हा जुनी उत्पादने पुढे आणि नवीन त्यानंतर घ्या. उत्पादनावर करण्याचा अवधी किवा तारीख सूचित केलेली असते, त्यानुसारच अन्न खाणे सुरक्षित आहे.
![]() |
ग्लोबल हंगर इंडेक्स (31 पॉइंट) |
यूएनचे 2030 पर्यंत झिरो हंगर उद्दिष्ट
आपण आपल्या सवयी बदलू शकतात. आपण काही सोप्या गोष्टी येथे करू शकतो. लहान लहान भाग घ्या किंवा रेस्टॉरंटमध्ये मोठे डिशेस सामायिक करा. मागे काहीही करू नका - आपल्या उरलेल्या दुसर्या जेवणासाठी ठेवा किंवा त्या वेगळ्या डिशमध्ये वापरा. आपल्याला आवश्यक असलेली केवळ खरेदी करा - खरेदीसह स्मार्ट व्हा. आपल्याला काय हवे आहे याची एक सूची बनवा आणि त्यास चिकटून राहा. आपण वापरण्यापेक्षा अधिक खरेदी करू नका. पूर्वग्रह बाळगू नका - "कुरूप" किंवा अनियमित आकाराचे फळे आणि भाज्या खरेदी करा, आपल्या फ्रीजची चाचणी घ्या - 1 ते 5 डिग्री सेल्सिअस तापमानात अन्न साठवून घ्या ताजे अन्न घ्या, प्रथम - आधीचे खरेदी केलेले उत्पादन वापरण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा आपण आपले फ्रीज आणि कपाटे यात स्टॉक कराल तेव्हा जुनी उत्पादने पुढे आणि नवीन त्यानंतर घ्या. उत्पादनावर करण्याचा अवधी किवा तारीख सूचित केलेली असते, त्यानुसारच अन्न खाणे सुरक्षित आहे,कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जनाचा जगातील तीसरा स्रोत
जगातील श्रीमंत देश आहेत त्यांच्याकडे अन्न नासाडीचे प्रमाण ही मोठे आहे. जीभेचे चोचले पुरवण्याच्या नादात खूप सारे अन्न वाया जाते. सहारा अफ्रीका भागातील खाद्य अन्न उत्पादन आहे, तेवढेच अन्न श्रीमंत देश वाया घालवतात असा ही एका अभ्यासात समोर आलेय त्यामुळे अमेरिका, चीन या देशांमध्ये ग्रीनगॅस उत्सर्जन खूप आहे. अमेरिका आणि चीन नंतर जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन हे अन्न नासाडी पासून होत असल्याचे समोर आलेय, तो एक देश असता तर कार्बनडाय ऑक्साइड तयार करणारा तीसरा देश ठरला असताImages sourse- by feeding India
दिगंबर मराठे