- सामाजिक जाणीवेचा जागर , गोदामाईचा सन्मान - TheAnchor

Breaking

September 9, 2019

सामाजिक जाणीवेचा जागर , गोदामाईचा सन्मान

नाशिक हे तसे मंत्रभूमी ते यंत्रभूमी म्हणून सर्वत्र परिचित आहे. एक पौराणिक महत्व असलेली पुण्यभूमी आहे.उत्तर महाराष्ट्राची जीवनवाहिनी  गोदावरीचा उगम ही येथेच होतो, त्यामुळे सर्वधर्म समभाव, पावित्र्य आणि ऋणानुबंध जपणे ही नाशिकची परंपरा आहे. या परंपरेची साक्ष घेऊन दरवर्षी मोठया उत्साहाने गणेशोत्सव नाशिककर साजरा करतात. या उत्साहात गणेशोत्सवाचे दहा दिवस कसे निघून जातात हे देखील कळत नाही.   

                 "देव द्या, देवपण घ्या"

एकता, बंधुता व समतेची जाणीव करुन देणारा गणेशोत्सव हा सण आहे. परंतु गणेशोत्सवाच्या उत्साहामध्ये आम्ही एवढे तल्लीन होऊन जातो की प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांपासून तयार केलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन “गोदामाईत” करतो, त्यामुळे गोदा प्रदुषण होते. या प्रदुषणामुळे गोदावरीचे पावित्र्य भंग झाल्याची जाणीवही आम्हाला होत नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधनांमुळे गोदावरी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतेय. गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या ९ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो.

   विद्यार्थी कृती समितीची सामाजिक जाणीव

गणेशोत्सवातील  १० दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली जातात. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करावे असे आवाहन केले जाते. नाशिकचे गोदाप्रेमी भाविक या आवाहनाला गेल्या ९ वर्षांपासून दरवर्षी भरभरून पाठिंबा देत आहेत.  त्यामुळे दरवर्षी हा उपक्रम राबविला जात असल्याने दिड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणारे नाशिककर स्वतःहून संपर्क साधून मूर्ती दान करण्यासाठी आग्रही भूमिका घेतात. “देव द्या, देवपण घ्या” उपक्रमांतर्गत भाविकांच्या घरी जाऊन देखील मूर्ती स्वीकारण्यात येतात. 

समाजकार्यात संवेदनशील असणे महत्वाचे आहे. त्यासाठी  तत्काळ प्रतिसाद दिल्यास समाजासाठी  आणि आपल्या शहरासाठी काम करण्याचा, संधी मिळाल्याचा आनंद यावेळी नक्कीच व्दिगुणित होतो. जनमाणसांच्या स्पंदनांचा सेतू जोडण्याचे कार्य अविरतपणे करण्यासाठी यंदा देखील गुरुवार दि. १२ सप्टेंबर २०१९ रोजी “देव द्या, देवपण घ्या” उपक्रम राबविला जाणार आहे. नाशिककरांनी मोठया संख्येने यात सहभाग होऊन गोदामाईला प्रदुषणापासून वाचविल्याचे पुण्य व समाधान मिळवावे हीच अपेक्षा !

फोटो:- देव द्या, देवपण घ्या उपक्रमांर्तगत गणेश मूर्ती स्वीकारताना विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार व समवेत कार्यकर्ते

  १० हजार भक्तांकडून  मूर्तीदान

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे शहरातील सुमारे १०, ३२८ भाविकांनी गणेशमूर्ती दान दिल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती तर्फे गेल्या ९ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवातील १० दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते.
          नाशिकच्या
गोदाप्रेमीभाविकांनी आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला उपक्रमाला  लोकमान्यमल्टीपर्ज सोसायटीचे सहकार्य लाभले होते. विसर्जनाच्या   दिवशी सकाळी ९ वाजेपासूनच विद्यार्थी कृती समितीचे सुमारे ३०० कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. जांभळ्या रंगाचे विद्यार्थी कृती समितीच्या नावाचे आकर्षक टी-शर्ट घातलेले हे कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. या उपक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य लाभले होते.


यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. सुमारे ६ फुटापेक्षा जास्त उंचीच्या विविध मंडळाच्या व घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती यावेळी दान करण्यात आल्या. या मुर्ती अत्यंत भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या.




       गोदा प्रदूषणमुक्तीसाठी झटणारे हात
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, जयंत सोनवणे, रोहित कळमकर, राहुल मकवाना, संकेत निमसे, तुषार गायकवाड, मयूर पवार, अविनाश बरबडे, भावेश पवार, सागर दरेकर, साईराज निकम, सिद्धेश दराडे, अमोल भांड, गणेश शेळके, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे व्यवस्थापक प्रकाश चितोळकर, सुशांत पाटील, दिगंबर काकड, वैष्णवी जोशी, मदन म्हैसधुणे, दीपाली जाधव, भगवान भोये, स्नेहल उफाडे, नरेंद्र वाणी, नीलिमा चव्हाण, विशाल वाघ, प्रतीक्षा वाखारे, चेतन सानप, मोनाली गवे, अमोल गायकवाड, कौस्तुभ सोनवणे, रोहिणी सोनवणे, समर्थ चव्हाण, हर्षदा राजभोज, मनोज पाटील, विनिता पाटील, युवराज गायकवाड, सागर कुलकर्णी, मानसी ब्राम्हणकर, कुणाल आहेर, वैष्णवी बाविस्कर, पियुष पाटील, राहुल घोडे,  अश्विता निखाडे, विश्राम राउत, जयश्री नंदवानी, निवृत्ती गवळी, प्रतीक्षा उखाडे, गौरव महाले, सुवर्णा आढळ, हरी चौधरी, भाग्यश्री जाधव, हिरामण बगाले, अंकिता बिटवा, गणेश पवार, धनश्री जाधव, कुणाल आहेर, स्नेहल पवार, पियुष पाटील, कोमल गांगुर्डे, राहुल घोडे, वृषाली जाधव, दुर्गा गुप्ता, प्रल्हाद कनोजे, तेजश्री गायकवाड, शुभांगी सोळुंके, राहुल रायते,  किशोरी गटकळ, विकास ओढेकर, सुप्रिया बिरारी, रघु शिंदे, चैताली सोनार, हिराज गावित, प्रदीप वर्मा, ऋषिकेश नन्नावरे, विजय गुरुळे, आदित्य दरेकर, ऋषिकेश निकम, हेमंत बागुल, राजेंद्र चव्हाण, राज परदेशी, सागर बच्छाव, तुषार इपर, विनोद जाडे, ललित पिंगळे, योगेश माळोदे, किशोर वाघ आदींनी परिश्रम घेतले.




   

         अभिजित खांडकेकर, प्रसिद्ध अभिनेता


           
आकाश पगार (लेखक)
अध्यक्ष, विद्यार्थी कृती समिती, नाशिक
मोबाइल-९४२१५६३५५