कोरोना विषाणू चीन पाठोपाठ जगभर पसरला आहे. सर्वात आधी वुहान शहरातून या विषाणुचा प्रसार झाला, पाठोपाठ हुबेई प्रांतात ही पसरला परंतु सध्या वुहान वगळता इतर ठिकाणी या साथीला आटोक्यात आणल्याचे सांगितले जात आहे. आता तो चीन बाहेर ईराण, इटली, स्पेन, जर्मनी, फ्रांस आणि अमेरिका यादेशांमध्ये त्याचा मोठया प्रमाणात फैलाव झालाय. त्यामुळे डब्लूएचओने मागील सप्ताहांत चिंता ही व्यक्त केली होती. २२ जानेवारीच्या तुलनेत मार्चमध्ये साथ काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात चीनला आणि दक्षिण कोरिया यांना यश आले, परंतु आता तो जगभर पसरला आहे. या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी डब्लूएचओसह बाधीत देशांनी कंबर कसली आहे. यापूर्वीच्या इबोला, सार्स, एमईआरएस(MERS-coV) या सर्व विषाणूच्या तुलनेत कोरोना वेगळा आणि नवीन आहे. त्यामुळे डब्लूएचओने त्याचे वर्गीकरण कोविड-19 असे केले आहे. प्रथमदर्शनी काही गट, समुहातून तो पसरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या लक्षात आले.राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृतपत्रांत, वृतवाहिन्या आणि सोशल मीडियात काही वैद्यकीय संस्था प्रयोगशाळा यांनी कोरोनावर लस तयार केल्याची बातमी सोशल मीडियात वायरल झाली, मात्र डब्लूएचओने यावर कुठलाच खुलासा किंवा दुजोरा दिलेला नाही. अमेरिकेच्या मॉर्डना संस्थेने mRNA 1273 ही लस तयार केली असून मनुष्यावर चाचणीस सुरुवात झाली मे किंवा जून महिन्यात आपात्कालीन स्थिती लक्षात घेता तयार केला जाईल हेल्थकेयर कार्यकर्ते आणि काही लोकांवर लसीच्या चाचण्या केल्या जातील, त्यादरम्यान त्यांच्यावर निरीक्षण ठेवले जाईल. सर्वसामान्यासाठी ही लस उपलब्ध व्हायला 12 ते 18 महिन्याचा कालावधी लागणार आहे. सद्या तिच्या चाचण्या फेस-1 टप्प्यात आहे. चीनची कॅनसिनो बायोलॉजिकल अँड बीजिंग इंस्टिट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजी ही अडेनोवायरस टाइप वेक्टर या लसीवर काम करत आहे. त्यामुळे सद्या तरी लस किंवा औषध अजून उपलब्ध नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवणे आणि गरज पडल्यास आरोग्य संस्था किंवा आपल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे महत्वाचे आहे.
![]() |
Photo credit by WHO and respected owner |
कोरोनाची लक्षणे
नवीन कोरोनोव्हायरसच्या संसर्गामुळे ताप येणे (म्हणजेच शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा जास्त असणे) अशा लोकांना शोधण्यासाठी थर्मल स्कॅनर प्रभावी काम करतं, करोनाचे वैशिष्ट्य म्हणजे संक्रमित झाल्यावर लोक आजारी पडतात आणि ताप येण्यापूर्वी 2 ते 10 दिवसात लक्षणे दिसू लागतात, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि तापाचे प्रमाण जास्त असणे असे लक्षणे आढळून आलेल्या संशयित व्यक्तिला 14 दिवस डॉक्टरांच्या निगरानी खाली ठेवले जाते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्याचे ह्यूमन टू ह्यूमन पसरण्याचे प्रमाण जास्त आढळून आल्याने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. तसेही मृत्यूचे प्रमाण कमी आहे. एकंदरीत सावधानी बाळगणे गरजेचे आहे.
घाबरू नका, अशी घ्या काळजी ?
नेहमी जवळ रूमाल बाळगावा, खोकणाऱ्या रुग्णाशी जवळचा संपर्क टाळावा, नेहमी हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावे, स्वतःला बरे नसल्यास इतरांशी जवळचा संपर्क टाळावा, अन्न शिजवूनच खावे, ताप,सर्दी,खोकला असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. अफवांना बळी पडू नये, कोरोनाविषयी अद्ययावत माहिती हवी असल्यास आपल्या नजिकच्या सरकारी आरोग्य केंद्रात किंवा WHO वेबसाइटवर जाऊन माहिती घेऊ शकता.
![]() |
Photo:WHO |
चार देशात 90 टक्के बाधीत
रिपब्लिक ऑफ कोरिया 7869 बाधीत (मृत्यू-60), इटली 12462 (मृत्यू-872), इराण 9000 (मृत्यू-354) आणि चीन 80981 (मृत्यू-3173) अशी आकडेवारी असून या देशांमध्ये बाधीतांची वाढती संख्या सर्वात मोठी असल्याची चिंता डब्लूएचओने व्यक्त केलीय. त्यापैकी चीन आणि रिपब्लिक ऑफ कोरिया या दोन देशांनी साथीचा रोग कमी केला आहे. इराणची परिस्थिती बघता डब्ल्यूएचओची एक टीम इराणमध्ये पाठवण्यात आली असून त्या दृष्टीने काम सुरू झालेय, त्यासाठीचा आवश्यक सामग्रीचा पुरवठा करण्यात आला आहे. आपल्या सर्वाना साथीचे ज्ञान जाणून घेणे गरजेचे असून त्यास पराभूत करण्याची ती पहिली पायरी आहे. दक्षिण कोरियात पसरलेला कोरोना अधोरेखित करतो की हा एक अनोखा वैशिष्ट्य असलेला एक व्हायरस आहे. हा विषाणू इन्फ्लूएंझा नाही. स्थानिक आरोग्य अधिकारी आणि स्थानिक आरोग्य व्यावसायिकांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन व्यक्ती, कुटुंब आणि समुदायांनी केले पाहिजे असे आवाहन आता केले जात आहे.
कोरोना जागतिक परिस्थिती
गेल्या दोन आठवड्यांत चीनबाहेर कोविड-१९ घटनांमध्ये 13 पट वाढ झाली आहे आणि बाधित देशांची संख्या तिप्पट झाली आहे. चीन व्यतिरिक्त बाहेरच्या 177 देशात 44067 लोक कोरोनाने बाधीत तर 1440 जणांना जीव गमवावा लागला आहे. जगात ऐकून 118 देशांमध्ये आतापर्यंत 1,25,048 हून अधिक प्रकरणे आहेत आणि 4,613 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चिनमध्ये 80981 लोक बाधीत झाले असून 3173 लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक इस्पितळात आपल्या जीवासाठी लढत आहेत. येत्या काही दिवस आणि आठवड्यांत घटना वाढण्याची शक्यता असून, प्रभावित देशांच्या संख्येवर डब्लूएचओ लक्ष ठेवून आहे.
म्हणूनच आम्ही मूल्यांकन केले की कोविड -19 ला एक साथीचा रोग म्हणून संबोधले जाऊ शकते. कोरोनोव्हायरसद्वारे पसरलेला साथीचा रोग आपण यापूर्वी कधीही पाहिला नाही. कोरोनाव्हायरसमुळे होणारी ही पहिली महामारी आहे, असे डब्लूएचओने म्हटलेय. 77 देशांमध्ये कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत आणि 57 देशांमध्ये १० किंवा त्याहून कमी आहे.
डब्लूएचओचे PPE उत्पादन वाढीचे आवाहन
डब्ल्यूएचओने वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) चे 40 टक्के उत्पादन वाढवण्याचे आवाहन उद्योग आणि विविध सरकारांना तसेच डब्लूएचओच्या साखळीतील संघटनांना केले आहे.
हेल्थकेअर कर्मचारी स्वत: चे आणि त्यांच्या रूग्णांना संसर्ग होण्यापासून आणि इतरांना संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणांवर अवलंबून असतात. परंतु हातमोजे, वैद्यकीय मुखवटे, श्वसन यंत्र, गॉगल, चेहरा ढाल, गाऊन आणि अॅप्रॉन यासारख्या उत्पादनाचा पुरवठा मर्यादित असल्याने डॉक्टर, परिचारिका आणि इतर फ्रंटलाइन कर्मचारी कोविड -19 रुग्णांची काळजी घेण्यासाठी धोकादायक स्थितीत काम करत आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षाही महत्वाची आहे.
सुरक्षित पुरवठा साखळ्यांशिवाय जगभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना होणारा धोका वास्तविक आहे. त्यामुळे पुरवठा वाढविण्यासाठी, निर्यातबंदीमध्ये शिथिलता आणण्यासोबत सट्टेबाजी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनासाठी उद्योग आणि सरकारांनी कामाची गती वाढवण्याची गरज असून प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण केल्याशिवाय आम्ही कोविड -१९ थांबवणे अवघड होऊ शकते असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅड्नॉम घीबाईस म्हणाले.
![]() |
Photo:WHO |
डब्ल्यूएचओ ऑपरेशन्स सप्लाई अँड लॉजिस्टिक्सतर्फे(ओएसएल) कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी गंभीर वस्तूंची जागतिक मागणी करणाऱ्या अशा सर्व देशांना तातडीने PPE साधनांचा पुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. उद्रेक सुरू झाल्यापासून ओएसएलने 93 देशांना 584,000 हून अधिक सर्जिकल मास्क, 47,000 एन 95 मास्क, 620,000 हातमोजे, 72,000 गाऊन आणि 11,000 गॉगल पाठविले आहेत.
आयएटीए IATA आणि WHO चे दिशानिर्देश
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनने विमान कंपन्या आणि विमानतळ हाताणाऱ्या व्यवस्थापनासाठी काही दिशानिर्देश जारी केले आहे. विमानातील एयरहोस्टेस आणि इतर स्टाफला मास्क तसेच विषाणूपासून संरक्षित करणारी साधने वापरण्यास सांगितले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणाऱ्या विमानतळावर थर्मल स्क्रीन बसविण्याचे निर्देश एका आठोडयापूर्वीच दिलेत. प्रवासी हाताळतांना सावधानी घ्या अशा सूचना देण्यात आल्या आहे. तसेच प्रवाशांनी प्रवास करतांना सतर्कता बाळगावी असे स्पष्ट केले आहे.
डब्लूएचओचे 300 संशोधकांसोबत मंथन
नवीन कोविड -19 साथीच्या संशोधन पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा मुख्यालयात जगातील आघाडीच्या आरोग्य तज्ञांची दोन दिवसीय बैठक दि.11 आणि 12 फेब्रुवारी रोजी झाली. भविष्यातील कोणत्याही उद्रेकाच्या तयारीसाठी संशोधनास गती देण्यावर आणि वित्तपुरवठा करण्यावर संदर्भात चर्चा झाली.
दोन दिवस डब्ल्यूएचओच्या मंचावर संशोधन आणि विकासाबाबत रोडमॅप ठरविण्याच्या अनुषंगाने मंथन करण्यात येऊन, साथीला लवकर आटोक्यात आणण्यासाठी औषधे आणि लस विकसित करण्याची आणि संशोधन व विकास वेगवान करण्याचे धोरण अवलंबण्याचे ठरले.
हा उद्रेक एकात्मता चाचणी आहे, राजकीय, आर्थिक आणि वैज्ञानिक. सीमांचा आदर न करणाऱ्या समान शत्रूशी लढण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. हा उद्रेक संपवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक संसाधने असल्याचे सुनिश्चित करणे आणि आपल्या सामायिक समस्यांचे सामायिक उत्तरे शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे आता सर्वोत्कृष्ट विज्ञान समोर आणले पाहिजे असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅड्नॉम घीबाईस म्हणाले
या सभेमुळे आम्हाला संशोधनासाठी तत्काळ प्राथमिकता ओळखण्याची परवानगी मिळाली. जागतिक वित्त संघटनेच्या सहकार्याने या संकटावर मात करण्यासाठी आणि संशोधन थांबवण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन सक्षम करण्यासाठी आम्ही वित्त पुरवठादारांचा एक गट या नात्याने संघटना, समन्वय साधणे आणि संरेखित करणे सुरू ठेवू, असे ग्लोपीआयडी-आरचे अध्यक्ष प्रोफेसर यज्ञदान म्हणाले.
(GloPID-R is a global alliance of international research funding organizations)
![]() |
जनहितार्थ |
(GloPID-R is a global alliance of international research funding organizations)
(Content sourse and photo by WHO and media sourse)