- Covid-19: अविश्वासू महासत्ता, बेसावध जग - TheAnchor

Breaking

March 29, 2020

Covid-19: अविश्वासू महासत्ता, बेसावध जग

कोरोना वायरसने जगाला आपल्या बाहूपाशात घेतले आहे. बघता बघता डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यातच विषाणू जगभर पसरल्याने त्याच्या विरोधात आता गंभीर लढाई सुरू झालीय. सुरुवातीला सर्वानीच कोविड-19 महामारीला हलक्यात घेतले. 2019 डिसेंबर अखेर या महामारीची माहिती डब्लूएचओकडे आली, त्यावेळी वुहान सिटीत कोरोनाने पाय पसरले होते, त्यामुळे वुहान सिटीच्या सीमापूर्ण बंद करण्यात आल्या. मुळात 30 डिसेंबरला तो समोर आला. डोळ्याचे डॉ. शी वेनलियांग यांनी वुहान मासळी बाजारातून 7 केसेस समोर आल्या आहेत. तो खतरनाक असून आपल्या फॅमिलीला सुरक्षित ठेवा असा मेसेज वुहान यूनिवर्सिटी क्लिनिकल ग्रुपवर शेयर केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तेथे पाबंदी आहे. बाहेरील फेसबुक, ट्विट्टर सारख्या सोशल मिडियावर बंदी असल्याने फक्त चीनच्या सोशल माध्यमाला परवानगी आहे. त्यावरील मजकुरावर देखील सरकारचे बारीक लक्ष असते, त्यातच हा मेसेज लीक झाला. त्यामुळे जगाला कळाले, त्यानंतर मात्र चीन पोलिस 3 जानेवारीला डॉ शी पर्यंत येऊन धडकले आणि त्यांना शांत राहण्याचा दम भरला. 7 जानेवारीला त्यांना ही कोरोनाची  लागण झाली, त्यात त्यांचा मृत्यू  झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. शी प्रत्येक घडामोड आपल्या मित्रांशी सोशल मिडियात शेयर करत होते. त्यांच्या अशा मृत्यूने जगाला धक्का बसला, लोकांनी #wewantfreedomofspeech  असा हॅशटॅग चालवून विरोध केला. त्यामुळे जगाला चीनमध्ये काही तरी सुरू आहे याची कुणकुण लागली आणि जग सावध झाले, त्यामुळे त्यांना विसलब्लोर शी असे म्हटले जाते. जग नेहमीच चीनकडे संशयाने बघते कारण आपल्या अंतर्गत गोष्टी चीन बाहेर येऊन देत नाही. मात्र चीनच्या अशा वागण्याने कोरोनाची माहिती जगाला उशिरा कळाल्याने त्याचे परिणाम आता  समोर येत आहे. दि. 1 जानेवारी 2020 या नवीन वर्षाचा जल्लोषात जग मग्न होतं, त्यासाठी बाहेर देशातील अनेक चीनी नागरिक, पर्यटक वुहामध्ये होते. त्यानंतरच ते आपल्या देशात गेले. चीन नंतर मात्र करोना विषाणू हळूहळू दक्षिण कोरिया, ईराण, इटली, अमेरिका यादेशात पसरला, चीन नेहमीच आपल्या अंतर्गत गोष्टी बाहेर येऊ देत नाही, त्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो हे अनेकदा समोर आलेय. डॉ. शी यांग यांनी जगाला या वायरस विषयी अलर्ट केले. त्यानंतर शी यांना त्याचीच किंमत मोजावी लागल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे चीनने ही घटना उशिरा उघड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे इतर देश गाफिल होते, त्यांच्या सीमा खुल्या होत्या. गांभीर्य लक्षात आले नाही. त्याआधीच तो दक्षिण कोरिया, इराण, जापान आणि इटलीमध्ये पसरला.

Corona-19-world-efect-corona
फोटो:फाईल




G-7 देशांसह इतर आर्थिक महासत्तांना तडाखा

Covid-19-world-effect
फोटो:फाइल

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाशी काही लोक संबंध जोडत आहे.  यापूर्वी अमेरिकेने जुलै ते ऑक्टोबर 2019 याकाळात  आयात होणाऱ्या चीनच्या उत्पादनावर (टेरिफ) तीनवेळा शुक्ल आकारणी केली. त्याचा चीनला आर्थिक फटका सहन करावा लागला, अमेरिकेची ही दादागिरी असल्याचा आरोप चीनने केला. आता आर्थिक महासत्तांचे भांडण कधी जगला वेठीस धरेल याचा नेम नाही.  अमेरिकेला कोरोना जैविक हत्यार असल्याचा दाट संशय आहे. तो वुहान येथील प्रयोगशाळेतून पसरला असा आरोप ही अमेरिकेने केलाय, ते बायोहत्यार होते अशी ठाम भूमिका घेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी वायरस संबोधत चीनवर आरोप केलाय, चीनने यावर हरकत घेतलीय, WHO ही ट्रम्प यांच्या विधानाशी सहमत नाही. अमेरिका जगात 21.43 ट्रिलियन डॉलरची पहिली आर्थिक महासता आहे. त्यानंतर चीन  दुसरी 14 बिलियन डॉलर, मग जापान, जर्मनी, भारत, फ्रांस, ब्रिटेन, इटली असा क्रम आहे. यातील अमेरिका आणि युरोप खंडातील प्रगत देशाना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. सुरुवातीच्या काळातच कोरानाचे गांभीर्य लक्षात आल्यावर  गुंतवणुकदारांनी 20 फेब्रूवारी 2020 रोजी युएस इक्विटी बाजारात मोठया प्रमाणात शेयर विक्रीला आणले, त्याने यूएसला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले, याबाबत (IMF) आईएमएफच्या अधिकारी गीता गोपीनाथन यांच्या ही लेखात त्याचा उल्लेख आहे, ही परिस्थिती तशीच आहे जशी अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यावेळी होती. त्यामुळे उद्योग जगताला हा मोठा फटका मानला जात आहे. त्याचा परिणाम आर्थिक विकास वृध्दीदरावर होणार आहे. तशीच परिस्थिती युरोप मधील आहे. अमेरिका खंडातील उत्तर अमेरिका, कॅनडा, ब्राझिल यांचा तर  तर जर्मनी, फ्रांस, यूके, इटली,स्पेन यांचा युरोप खंडात समावेश आहे. हे सर्व विकसित आर्थिक सक्षम  देश आहे. यातील प्रत्येक देशासोबत चीनचे आर्थिक किंवा समुद्री हद्दीवरुन  वाद आहे. दि. 23 मार्च रोजी आईएमएफच्या प्रबंध संचालक क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांनी G20 देशांच्या वित्तमंत्री आणि  केंद्रीय बँक गव्हर्नरांच्या एका संमेलनानंतर मत व्यक्त करतांना 2020 हे वर्ष आर्थिक दृष्टिकोणातून नकारात्मक आहे. 2021 ला परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे. संकट सुरू होण्याच्या प्रारंभिक काळात शेयर बाजारातून 83 बिलियन अमेरिकी डॉलर इतकी विक्रमी गुंतवणूक भागधारकांनी काढून घेतली. आतापर्यंत ही सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे असे स्पस्ट केले. दोन महीने टाळेबंद असलेली वुहान सीटी चीन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनला वुहान सिटीत कोरोनाला रोखण्यात आश्चर्यकारक यश आल्याचे दिसून येते यांचा सरळ अर्थ असा की चीनकडे कोरोनाचा तोड आहे? दुसरी गोष्ट अशी की चीनने पुन्हा उत्पादन सुरू केलं असून स्पेनला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी 432 मिलियन युरोचा करार केला आहे, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाच्या पोर्टलने दि. 25 मार्च रोजी परदेशी वृतसंस्थेचा हवाल्याने दिली आहे. त्यामुळेच आता खऱ्या अर्थाने खेळ सुरू झालाय.