त्र्यंबकेश्वर।प्रतिनिधी: राज्यातील सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयं आणि महत्वाच्या देवस्थानांना आ. रोहित पवार यांनी मदतीचा हात पुढे केला असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगीगड येथे प्रत्येकी १०० लीटर सॅनीटायझर भेट दिले.
![]() |
फोटो:फाईल |
राज्यात कोवीड १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वच क्षेत्रातील दानशूर व्यक्ती आपापली सामाजिक बांधीलकी जपत शक्य होईल तेवढी मदत करत आहे. राज्यातील उभरते नेतृत्व, ऊर्जावान आणि दूरदृष्टी असलेले युवानेते आ. रोहित पवार यांनी ही शक्य होईल तेवढी वैयक्तिक पातळीवर मदत सुरू केली आहे. नुकतेच त्यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लींग संस्थानला १०० लीटर सॅनीटायझर दिले.
तुटवडा असलेल्या हॅंड सॅनीटायझरचा वापर मंदीरातील कर्मचारी आणि पोलिसांना करता यावा, या उद्देशाने कोरोनापासुन सुरक्षा करण्यासंदर्भात आ.रोहीत पवार यांनी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली आणि सॅनीटायझर पाठविले.
याप्रसंगी ट्रस्टी प्रशांत गायधनी, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ,राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस शहराध्यक्ष विजय गांगुर्डे ,व्यवस्थापक राजाभाऊ जोशी,भांगरे आदिं उपस्थित होते.
प्रशांत गायधनी यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे सॅनीटायझर भेट दिल्याने आ.रोहीत पवार आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.