- जिल्ह्यात 55 कोरोना बाधीत व्यक्ती - TheAnchor

Breaking

April 16, 2020

जिल्ह्यात 55 कोरोना बाधीत व्यक्ती

नाशिक।प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यात आज दोन वयोवृद्ध रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यामुळे ऐकूण कारोना बाधीतांची संख्या 55 झाली आहे. 
Corona-covid19-corona-virus
फोटो:फाईल
नाशिक शहर सातपूर-अंबड लिंक रोडवरील एक 63 वर्षांची वृद्ध महिला आणि दुसरे मालेगाव येथील 64 वर्षांचे पुरुष अशा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर पुरुष बाधितास एंजिओप्लास्टीसाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच 16  एप्रिल 2020 रोजी  दुपारी 3:00 वाजेपर्यंत मिळालेल्या  आकडेवारीनुसार  जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या  48 इतकी झाली आहे.  मालेगाव :40 , नाशिक शहर 5 आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील 03 ऐसे एकूण  48 अशी आहे. दरम्यान मालेगाव मधील 26 अहवाल निगेटिव्ह आले आहे. मालेगाव मधील आणखी 7 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.