नाशिक। प्रतिनिधी: नाशिक शहरात आणखी 4 करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहे. ते सर्व रुग्ण हे अंबड लिंक रोड येथील रुग्णाचे निकटवर्तीय आहे. हे सर्व रुग्ण झाकीर हुसेन रुग्णालयात या पूर्वीच उपचार घेत आहे. शहरातील रुग्ण संख्या आता 9
मालेगाव येथे ही 5 रुग्ण पोझिटीव्ह आढळले आहे. जिल्ह्यात बाधीतांची संख्या आता 79 वर पोहचली आहे. तर एकटया मालेगावमध्ये बाधीतांची संख्या 67 झाली आहे. सध्या मालेगाव कोरोना हॉटस्पॉट आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच थांबून शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्या असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.