- सिव्हीलमधील पहिल्या कोरोना बाधीताला डिस्चार्ज - TheAnchor

Breaking

April 14, 2020

सिव्हीलमधील पहिल्या कोरोना बाधीताला डिस्चार्ज

तबरेज शेख
नाशिक। लासलगावचा कोरोना बाधीत रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो रुग्ण आता पूर्ण बरा झाला आहे. त्यामुळे त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे नाशिकमधील कोरोना लढ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. 
First-patient-discharge-in-civil-civid-19
29 मार्चला तो संशयित म्हणून दाखल झाला होता. लासलगावला बेकरीत काम करणारा हा युवक कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्याच्यावर सिव्हीलच्या कोरोना कक्षात 16 दिवस उपचार करण्यात आले. डॉक्टर आणि त्यांच्या सहकारी स्टाफने त्यासाठी विशेष मेहनत घेतली तसेच रुग्णाने  उपचारादरम्यान चांगला प्रतिसाद दिल्याने, पॉझिटिव्ह असलेला हा युवक बरा होऊन, त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी टाळ्या वाजवून त्याला निरोप देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निखिल सैंदाने, जी.पच्या  सीईओ  लीना बनसोड यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ  उपस्थित होता.