नाशिक : महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी आज आपल्या नाशिक येथील निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करत दिवा लाऊन त्यांच्या विचारांचे स्मरण करत जयंती साजरी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मीनाताई भुजबळ व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
राज्यात कोरोनाचे वाढते संकट बघता ज्ञानाचा दिवा लावून महात्मा फुले यांची जयंती साजरी करावी असे आवाहन खासदार शरदचंद्र पवार यांनी केले होते. त्यानंतर ना.छगन भुजबळ यांनी आपआपल्या घरात प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करून साजरी करण्यात येऊन शासनाच्या सोशल डिस्टन्स सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार महाराष्ट्रात आज घराघरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. ना.छगन भुजबळ यांनी आज आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत आपल्या नाशिक येथील निवासस्थानी महात्मा फुले यांची जयंती साजरी केली.