मुंबई। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी मंत्रालय,मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन १४ एप्रिल हा दिवस वाचनदिन म्हणून घरातच साजरा करावा, असे आवाहनही भुजबळ यांनी राज्यातील जनतेला केले आहे. ते कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीसाठी मंत्रालयात गेले होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन १४ एप्रिल हा दिवस वाचन दिन म्हणून घरातच साजरा करावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला केले होते.
यावेळी ना. भुजबळ म्हणाले की , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला. बौद्ध धम्माची दीक्षा दिली. राज्यात कोरोनाचे वाढते संकट बघता नुकताच ११ एप्रिलला आपण महात्मा फुले यांचा जन्मदिवस एक ज्ञानाचा दिवा लावून घरात साजरा केला. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय थोर असे ज्ञानी पुरुष होते. अनेक पुस्तक त्यांनी लिहिली आणि उपदेश केला की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांची ही शिकवण डोळ्यासमोर ठेवण्यासाठी आजचा दिवस आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन आपण घराघरात करून साजरी करूया असे त्यांनी सांगितले.