- कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन - TheAnchor

Breaking

April 16, 2020

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे.

Needy-artist-contact-film-corporation
फोटो क्रेडिट: रवी जन्नावार
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत आहे, लेखक, गायक, डायरेक्टर, स्पॉट बॉय, सिनेमॅटोग्राफर, गीतकार,  संगीतकार आदिंची उत्पन्नाची आवक थांबली आहे, आणि उत्पन्नाची आवक  पुन्हा लवकर  सुरू होऊन परिस्थिती लवकर पूर्वपदावर येण्याची चिन्हे तुर्तास तरी दिसत नाही.  अखिल भारतीय  मराठीचित्रपट महामंडळ नाशिक शाखा आवाहन करीत आहे की आपल्या नाशिकमधल्या दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हाताने कलासृष्टीतील लोकांच मदत करावी  सरकारने देखील कलाकारांच्या अडचणी सोडवण्यास मदत करावी असे आवाहन नाशिक शाख्येने केले आहे.