- मास्क न वापरणाऱ्या 33 जणांवर पोलिसांची कारवाई - TheAnchor

Breaking

April 13, 2020

मास्क न वापरणाऱ्या 33 जणांवर पोलिसांची कारवाई

नाशिक। प्रतिनिधी: संचारबंदी काळात मास्क न घातला फिरण्यास मनाई आहे, तरी मास्क न घालता बेफिकीरपणे फिरणारे आढळून आल्याने अशा 33 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

फोटो: फाईल

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा लागू असून या काळात नाशिक जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांनी वेळोवेळी आदेश ही जारी केलेले आहेत. त्यात जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्य सेवा वगळता संचारबंदी आणि वाहनबंदी लागू आहे. नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. 

या अनुषंगाने  परिमंडल 2 नाशिकचे पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी हद्दीत येणाऱ्या अंबड, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प सर्व पोलिस ठाण्यांना कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 21 जणांवर कलम 188 अंतर्गत कारवाई केली आहे. आतापर्यंत 33 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी कायदयाचे पालन करावे असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील आणि उपायुक्त विजय खरात यांनी केले आहे.