- शहरात मास्क न वापरणाऱ्या 85 जणांवर पोलिसांची कारवाई - TheAnchor

Breaking

April 16, 2020

शहरात मास्क न वापरणाऱ्या 85 जणांवर पोलिसांची कारवाई

तबरेज शेख
नाशिक। शहरात संचारबंदी काळात मास्क न वापणाऱ्या 85 जणांवर आतापर्यंत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तर आज मास्क न घालणाऱ्या 29 आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 82 लोकांवर कारवाई केली. दि. 11 ते 15 एप्रिल दरम्यान एकटया परिमंडळ २ हद्दीत  मास्क  न वापरणाऱ्या  32 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. दि.22 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 2851 गुन्हे नोदवले आहेत.

Police-action-aganst-who-use-mask

फोटो क्रेडिट: नाशिक प्रेस ग्रुप

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा लागू असून जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्यसेवा वगळता संचारबंदी आणि वाहनबंदी लागू आहे. या काळात नागरिकांना मास्क  वापरणे अनिवार्य आहे. 

या अनुषंगाने  परिमंडल 2 नाशिकचे पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी हद्दीत येणाऱ्या अंबड, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प सर्व पोलिस ठाण्यांना कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 32 जणांवर भा. द. वि.  कलम 188 अंतर्गत कारवाई केली.

पो. उपायुक्त खरात यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना पासून स्वत:ची आणि इतरांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी कायदयाचे पालन करावे असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील आणि उपायुक्त विजय खरात यांनी केले आहे

दरम्यान सरकारवाडा हद्दीत काल सायंकाळी परीचा बाग येथे वॉक करणाऱ्या 11 जणांवर पोलिसांनी भा.द. वि. कलम 188 प्रमाणे कारवाई केली, त्यात निर्भया पथकाची महत्वाची भूमिका होती.