- झेडपीतर्फे कोरोना लढयासाठी जिल्ह्यात 5 नवीन केंद्रे - TheAnchor

Breaking

April 20, 2020

झेडपीतर्फे कोरोना लढयासाठी जिल्ह्यात 5 नवीन केंद्रे

नाशिक। प्रतिनिधी: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना  जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेत झाली. यावेळी सुरक्षित अंतर ठेवून चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) दीपक चाटे व शिक्षणाधिकारी वैशाली झनकर उपस्थित होते.

Zp-corona-virus-covid-19
फोटो: टीम अँकर

वेंटिलेटर्सची गरज पडल्यास जिल्हा स्तरावर संदर्भित करणार:- डॉ. कपिल आहेर

प्रशासकीय पातळीवरील कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक औषध खरेदी, औषधी साहित्य वाटप व कोरोना रुग्ण आढळलेल्या तालुक्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय संशयित रुग्णशोध व आरोग्य शिक्षण देण्यासाठी आरोग्य कर्मचारी करत असलेल्या कामाचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांनी सादर केला. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य सामुग्री गरजेनुसार उपलब्ध करण्यात देण्यात आलेली असुन काही औषध सामुग्री यांची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावरुन राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित संपर्कात आलेले संशयित व कोरोना लक्षणे असलेले रुग्ण जिल्हा स्तरावर संदर्भीय न करता त्यांना त्याच तालुक्यात विलगीकरन करुन त्याच ठिकाणी त्यांना उपचार सुरू करणार आहेत. कोरोना संपर्कातील व्यक्ती किंवा संशयित रुग्णास आवश्यकता वाटल्यास किंवा व्हेंटिलेटर्सची गरज भासल्यास त्या रुग्णास जिल्हा स्तरावर संदर्भित करण्यात येणार आहेत.


जिल्ह्यात 5 केंद्र कार्यान्वित होणार

या आठवड्यात साधारण पाच केंद्र कार्यान्वित करण्याबाबत प्रशासन स्तरावरुन कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोना लढा देण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक या कार्यालाया मार्फत विविध पदांची आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांची भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात येत आहे.


आहार योजनेअंतर्गत ८१४७२२ अंडी वाटप:-चाटे

अमृत आहार योजने अंतर्गत जिल्ह्यातील एकूण सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील साधारण १२६६९८ बालकांना माहे एप्रिल, २०२० मध्ये ८१४७२२ अंडी वाटप करण्यात आल्याची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुलांना अमृत आहार योजने अंतर्गत देय असलेले साधारण पंधरा कोटी रुपये जिल्हा परिषद स्तरावरुन अंगणवाडी सेविका यांचे खाती वर्ग करण्यात आल्याची माहिती दीपक चाटे यांनी दिली.

Corona-virus-covid-19

गरज भासल्यास 22 शाळा अधिग्रहीत करू:-डॉ. झनकर 

जिल्ह्यात कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांसाठी आवश्यकता भासल्यास जिल्ह्यातील साधारण २२ खाजगी शाळा व शासकीय आश्रम शाळा अधिग्रहित करुन त्या ठिकाणी  संशयित कोरोना रुग्ण विलगीकरण कक्ष म्हणुन स्थापन करण्याबाबत कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली._ 

ग्रामीण रोजगार कामे उपलब्ध करणार:-परदेशी

महात्मा गांधी रोजगार योजने अंतर्गत ग्रामीण भागात सुरक्षित अंतर ठेवून ग्रामीण रोजगार यांना रोजगार उपलब्ध करुन देऊन कामे सुरू करण्यात आल्याची माहिती रवींद्र परदेशी यांनी दिली.

Corona-virus-covid-19

जिल्ह्यात अद्याप टँकर प्रस्ताव नाही:- एमएम खैरनार

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्य स्थितीत कुठेही पिण्याच्या पाणी टंचाई प्रस्ताव जिल्हा प्रशासनास प्राप्त नसुन भविष्यात पाणी टंचाई अंतर्गत टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झाल्यास तात्काळ टँकर मंजुरी बाबत कारवाही जिल्हा स्तरावरुन करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एम.एम. खैरनार यांनी दिली.

प्रशासनाचे काम चांगले:-अध्यक्ष, बाळासाहेब क्षीरसागर

जिल्हा परिषदेचे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना या संदर्भात प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करत आहे. ग्रामीण भागात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका हे भर उन्हामध्ये घरोघरी जाऊन कोरोना साथ सर्वेक्षण व आरोग्य शिक्षण देत आहेत. सोबत अमृत आहार योजने अंतर्गत अंडी व केळी पात्र लाभार्थी बालकांना प्रत्येकाचे घरी जाऊन वाटप केले जात आहे. कोरोना विरोधी लढ्यात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अभिनंदनास पात्र आहे :- बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक


प्रशासनातील समन्वय कायम ठेवा:-सीईओ बनकर

 कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेकामी जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. जिल्हा परिषद स्तरावरील खाते प्रमुख तालुकास्तरीय गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या विविध जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडत आहेत :- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.