- नागरिक हो घरीच थांबा, भाजीपाला ऑनलाइन मागवा; शेतकरी, युवकांची घरपोच भाजीपाला सेवा - TheAnchor

Breaking

April 9, 2020

नागरिक हो घरीच थांबा, भाजीपाला ऑनलाइन मागवा; शेतकरी, युवकांची घरपोच भाजीपाला सेवा

नाशिक। कोरोनावर मात करण्यासाठी आपण घरी थांबणे खूप गरजेचे आहे. ताजा भाजीपाल्यासाठी नागरिकांना बाहेर पडण्याची आता आवश्यकता नाही. काही युवकांच्या साथीने शेतकऱ्यांनी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. बस एका क्लिकवर ग्राहकांना  रास्त दरातील ताजा भाजीपाला मोफत घरपोच सेवेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
fresh-vegitable-farmar

फोटो: समाधान भारती
कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना ही सहन करावा लागत आहे. पिकवलेल्या मालाला कधी भाव नाही तर कधी वाहतुकीची कटकट शेतमाल उत्पादनासोबत माल विक्रीची चिंता अशी नेहमीचीच अडचण आहे. एकतर मिळेल याभावात माल विकावा लागतो अन्यथा फेकावा लागतो. दुसरीकडे नागरिकांना ताजा भाजीपाला मिळणे अवघड मग भाजी घेण्यासाठी बाजारात गर्दी करतात, त्यातही रास्त आणि ताजा भाजीपाला मिळेल याची शाश्वती नसते. त्यात बाजारात गर्दी करणे म्हणजे महामारीला आमंत्रण देण्याचाच प्रकार आहे. म्हणून ग्राहकांना घरपोच भाजीपाला मिळावा यासाठी काही युवकांनी मिळून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने https://farmr.shop  हे  संकेस्थळावर सुरू केलंय.
fresh-vegitable-farmar

नागरिकांनी फक्त या संकेस्थळावर जायचे आहे, मग काही क्षणांत आपल्या कुटुंबासाठी ताजा आणि चांगल्या प्रतिचा भाजीपाला आणि फळे विकत घेवू शकतात. तुम्हाला कुठलेही अँप मोबाईलवर इंस्टॉल करायची गरज नाही. हा भाजीपाला तुमच्या घरी मोफत पोहचवला जाणार आहे. तर  या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी 7709209261 क्रमांकावर किंवा *http://farmr.shop* या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
fresh-vegitable-fsrmar






















 *