अँकर वृत्तसेवा। कोरोना महामारीने जगाला आपल्या विळख्यात घेतले असून जगभर कोरोनाने 22 लाख 41 हजार 359 लोक आतापर्यंत बाधीत झाले आहे.तसेच जगातील मृतांचा आकडा (1,52,551) दिड लाखाच्या वर पोहचला आहे. 24 तासात नव्याने 81 हजार 153 लोक बाधीत झाले आहे. तर अमेरिका 2043, यूके 888 आणि स्पेनमधील 565 लोकांना नव्याने जीव गमवावा लागला आहे. जगात सर्वाधिक अमेरिकेत जवळपास 7 लाख लोक बाधीत आहे.
![]() |
Photo: file |
युरोप आणि अमेरिका खंडात सर्वाधिक बाधीत लोक आहेत. युरोपात 11,22,189 लोक बाधीत आहेत,24 तासात 35300 लोक नव्याने बाधीत झाले आहे तर आतापर्यंत ऐकूण मृत्यूचे प्रमाण 1,00,938 वर पोहचले असून युरोपात नव्याने 3737 लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपात स्पेन मध्ये 191726 इतके सर्वाधिक बाधीत असून 20043 लोकांना आतापर्यत जीव गमवावा लागला आहे त्यात स्पेनमध्ये 24 तासात 565 लोकांचा मृत्यू झालाय.इटलीत ऐकूण 175925 लोक बाधीत असून आतापर्यंत 23227 लोकांनी जीव गमवला आहे, नव्याने 480 लोकांचा मृत्यू झालाय. जर्मनीत 4294 तर यूकेत 15464 लोकांनी आतापर्यंत जीव गमवला असून युकेत नव्याने 888 लोकांचा मृत्यू झाला. 24 तासात अमेरिकेनंतर ही सर्वात मोठी आकडेवारी आहे.अमेरिकेत नव्याने 24 तासात 2043 लोकांनी जीव गमवला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 6,95,353 लोक बाधीत आहेत. आतापर्यंत 32427 लोकांनी जीव गमवला आहे. त्यानंतर ब्राझिल 33682 लोक बाधीत तर 2141 लोक मृत्यू पावलेत. कनाडात 32 हजार बाधीत झाले असून 1346 लोकांचा मृत्यू झाला आहे.
प्रशांत क्षेत्रात येणाऱ्या चीनमध्ये 84201 बाधीत लोक आहेत, त्यात नव्याने केवळ 21 जणांची भर पडली आहे, तर आतापर्यंत 4642 लोकांनी जीव गमवला आहे. नव्याने मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. त्यामुळे चीनने या महामारीला नियंत्रित केले आहे. दक्षिण कोरिया, जापान, ऑस्ट्रेलिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, मलेशिया यांनी देखील कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे दिसते. पूर्वमध्य क्षेत्रात इराण मध्ये 80 हजार लोक बाधीत झाले, तर आतापर्यंत 5031 लोकांचा जीव गेला आहे. दिलासादायक म्हणजे नवीन फक्त 73 रुग्ण आढळून आले. सऊदी अरब, पाकिस्तान, यूएई, कतार येथे ही मृत्यूचे प्रमाण कमी दिसते.
दक्षिणपूर्व आशियात 27319 लोक बाधीत आहेत. तर 1185 लोकांनी आतापर्यंत जीव गमविला आहे. भारतात 15712 लोक बाधीत आहेत, नवीन 1334 पॉझिटीव्ह आढळले आहे, 507 लोकांना जीव गमवावा लागला आहे. इंडोनिशियात 6248 बाधीत तर 535 लोकांचा मृत्यू झाला आहे. थायलंड आणि बांग्लादेशात 2 हजारावर रुग्ण बाधीत आहेत. मृतांचा आकडा शंभराच्या आत आहे. आश्चर्य म्हणजे बुद्धिष्ठ लोकसंख्या असलेल्या देशात मृत्यूचे प्रमाण शून्य आहे.