![]() |
फोटो:फाईल |
नाशिक। अँकर वृत्तसेवा:- मालेगाव येथील एका कोरना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मालेगाव येथील 6 रुग्णाचे नमुने घेतले होते, त्यांतील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यातील सकाळी मरण पावलेली एक व्यक्तीचा अहवाल ही आता प्राप्त झाला असून तो देखील पॉझिटिव आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. इतर चौघांवर मालेगाव शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातून ऐकूण 51 नमुने दि. 7 एप्रिल रोजी पुणे येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी मालेगावचे 6 नमुने होते त्यातील 5 जण पॉझिटव आढळले आहे. उर्वरित 40 नमुने निगेटिव असून 6 प्रलंबित आहे असे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान आज (दि. 9)जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि कृषी मंत्री दादाजी भुसे मालेगांव मध्ये तळ ठोकून आहेत. 300 ते 400 लोकांची एक टीम कामाला लागली आहे. संशयित आणि बाधित लोक जेथे होते, त्या भागातील लोकांची तपासणी केली जाणार आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. ती व्यक्ती कोठून प्रवास करुन आली याची माहिती घेतली जात आहे.