तबरेज शेख/ दिगंबर मराठे
नाशिक। दिवसरात्र रुग्ण सेवेला वाहून घेणारे आणि रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. असे मानणाऱ्या डॉक्टरांची खरी गरज आपल्याला आहे. तेच काम जिल्हा रुग्णालयाची टीम करत आहे त्यांनी नाशिककरांचा आणि रुग्णाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता, येणाऱ्ऱ्या प्रत्येक रुग्णाच्या सेवेत व्यस्त असलेली सर्व डॉक्टर, नर्स आणि त्यांना सहाय्य करणारी टीम चांगले काम करत आहे. स्वत:ला सांभाळून दरदिवशी येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे परपाडत आहे.
![]() |
फोटो: उदय रांजणगावकर |
रुग्णाला मानसिक आधार देत त्याला कणखर करुन त्याला बरे करणे म्हणायला सोपे असले तरी खरे तेच अवघड काम आहे. पण प्रत्येक अवघड काम एक आव्हान म्हणून स्विकारायचे आणि त्यात विजय मिळवायचाच असा आत्मविश्वास त्यांच्यात दिवसागणिक वृध्दीगत होत आहे. म्हणून सर्व टीमच्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम करावा लागेल, कोरोना विषाणू महामारीला पराभूत करण्याचा विडा जिल्हा रुग्णालयाच्या चमूने उचलला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निखिल सैंदाने, डॉ. प्रमोद गुंजाळ, डॉ. गणेश चेवले आणि नर्स, इतर स्टाफ यांनी 24 तास रुग्ण सेवेला वाहून घेत कर्तव्याला प्राधान्य दिले आहे.
नाशिकाला किरोना बाधितांची संख्या आटोक्यात ठेवणे याकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले. लासलगाव येथून 29 मार्चला एक संशयित रुग्ण दाखल झाला. त्याआधी 25 मार्चला त्याच्यात कोरानाची लक्षणे आढळली 27 मार्चला त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. अत्यंत कुशलतेने त्याला डॉक्टरांनी हाताळले, त्याला कोरना कक्षात ठेवून 16 दिवस उपचार करण्यात आले. डॉक्टर आणि त्यांच्या सहकारी स्टाफने त्यासाठी विशेष मेहनत घेतली तसेच रुग्णाने उपचारादरम्यान चांगला प्रतिसाद दिल्याने, पॉझिटिव्ह असलेला हा युवक बरा होऊन, त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी टाळ्या वाजवून त्याला निरोप देण्यात आला. मात्र डॉक्टर आणि त्यांच्या टीमने पुन्हा स्वत:ला कामात झोकून दिले आहे, त्यामुळे सिव्हिल सध्याच्या संकट काळात सर्वसामान्य गरीब आणि गरजू रुग्णाचा एकमेव आधारस्तंभ आहे जे रुग्णाच्या सेवेला ईश्वर सेवा मानत आहे.
डॉ.चेवले यांनी दिला आठवणीना उजाळा
![]() |
डॉ.गणेश चेवले |
साधारण तीन ते चार वर्षा पूर्वी एच1एन1 स्वाइन फ्ल्यू आजाराच्या काळातील परिस्थिती आठवली. त्यावेळी स्वाइन फ्ल्यू कक्षात कार्यरत होतो. रुग्णावर उपचार करतांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली. साहजिकच घरच्यांना काळजी वाटली पण डॉ. चेवले यांनी परिस्थिती संयमान हाताळली, स्वत:ला कुटुंबापासून काही काळ वेगळे ठेवले. घरात कॉरंटाइन होत त्यांनी स्वत:ला बरे केले आणि हाच अनुभव आता काम करतांना कामी आल्याचे सांगितले. इतरांशी संपर्क टाळा आणि शासनाचे निर्देश पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
रुग्णाचा चांगला प्रतिसाद
![]() |
डॉ. प्रमोद गुंजाळ |
रुग्ण आला तेव्हा त्याच्यात ताप आणि निमोनियाचे लक्षण आढळले त्याच्यावर कशा प्रकारे उपचार करायचे याची तयारी झालेली होती. रुग्णाने उपचाराला चांगला प्रतिसाद दिल्याने ही आमचे काम सोपे झाले. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉ. प्रमोद गुंजाळ यांनी सांगितले.