नाशिक/प्रतिनिधी: शहरात आज एकूण ४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी २ रुग्ण शहरातील असून २ रुग्ण हे मालेगाव येथील कार्यरत पोलीस आहेत त्यातील १ पोलीस धात्रक फाटा येथील तर दुसरा पोलीस कर्मचारी जैन मंदिर आडगाव परिसरातील रहिवाशी आहे.आत्तापर्यंत २६ प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे.
 |
फोटो:फाईल
मनपा हद्दीत एकूण ३९ कोरोना रुग्ण झाले आहे. नव्याने दोघा बाधीत रुग्णापैकी पहिला सिन्नर फाटा येथील रहिवाशी हा फळविक्रेता असून त्यास टायफेड झाल्याने तो दि. ८ मे २०२० रोजी तपासणीसाठी आला होता, त्याचा ही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्याला डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे, तर दुसरा पाटील नगर सिडको येथील महिला ही कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तिची आई कोरोना बाधित होती असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
|