- पंजाबमधून परतलेल्या महाराष्ट्रातील आणखी ४६ विद्यार्थ्यांची घरवापसी; एमईटी शिक्षण संस्थेचे सहकार्य - TheAnchor

Breaking

May 6, 2020

पंजाबमधून परतलेल्या महाराष्ट्रातील आणखी ४६ विद्यार्थ्यांची घरवापसी; एमईटी शिक्षण संस्थेचे सहकार्य

नाशिक/प्रतिनिधी: पंजाब मधील लव्हली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील १२० विद्यार्थ्यांना मा. खा. समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली काल भुजबळ नॉलेज सिटीच्या बसेसच्या माध्यमातून सुखरूप घर वापसी केल्यानंतर तर आज पुन्हा ४६ विद्यार्थ्यांना १ बस आणि इतर चार गाड्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागात पोहचविण्यात येत आहे. त्यासाठी मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथून ३ वाजेच्या सुमारास माजी आमदार पंकज भुजबळ, मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना बस आणि इतर वाहनाच्या माध्यमातून रवाना करण्यात आले आहे. 
Covid-19-cotona-virus
फोटो: विकास भुजबळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊनमध्ये पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थी अडकलेले होते. वैद्यकीय, कृषी, मॅनजमेंट, पीएचडी व इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व ना.छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या मदतीने पंजाब वरून नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे दि.४ मे २०२० रोजी १२० विद्यार्थी आणण्यात आले आहे. त्यानंतर दि.५ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेट भुजबळ नॉलेज सिटीमधील सहा बसेसच्या माध्यमातून पालकमंत्री ना.छगन भुजबळ, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी  सुखरूप पाठविण्यात आले.यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांचे सहकार्य लाभले.

Covid-19-cotona-virus

त्यानंतर आज पुन्हा उर्वरित ४६ विद्यार्थी २ बसच्या माध्यमातून मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे पोहोचले त्यांना मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या बस व इतर वाहनांच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यात आले आहे. काल आलेल्या १२० विद्यार्थ्यांना रात्री उशिरा मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतीगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी अल्पोपहार देऊन सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना सहा बसेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध  जिल्ह्यात पाठविण्यात आले होते

Covid-19-cotona-virus

त्यानंतर आज अहमदनगर ४, मुंबई-ठाणे ४, औरंगाबाद लातूर-६,बीड-४,पुणे-सातारा-सांगली-कोल्हापूर-२४, जळगाव-नागपूर-चंद्रपूर- भंडारा ६ असे एकूण ४६ विद्यार्थ्यांना १ बस व इतर ४ गाड्यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे. या सर्व बसेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवासात जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व बसेसचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

एसीपी आणि एमईटीचे विशेष आभार

 यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पंजाब मधील पदाधिकारी, खा. शरदचंद्र पवार, ना. छगन भुजबळ साहेब,मंत्री जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे व प्रशासनाच्या आम्ही अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.  तसेच आज आम्हाला भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून आपआपल्या घरी पोहचविण्याची व्यवस्था केली. आपल्या मुळे आज आम्ही आमच्या पालकांपर्यंत पोहचू शकत आहोत असे सांगत सर्वांचे आभार मानले. 
चैतन्य गाडेकर, विद्यार्थी