- जिल्ह्यात आतापर्यंत ६२२ करोनाबाधीत; कोणार्कनगर येथील कोरोनाबाधीत पोलिसाचा मृत्यू - TheAnchor

Breaking

May 9, 2020

जिल्ह्यात आतापर्यंत ६२२ करोनाबाधीत; कोणार्कनगर येथील कोरोनाबाधीत पोलिसाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात करोनाचे थैमान सुरुच असून, शनिवारी सकाळी शहरातील आडगावजवळील कोणार्कनगरमधील एका ५१ वर्षीय करोनाबाधित पोलिसाचा मृत्यू झाला. मालेगाव येथे सेवा बजावत असताना ते बाधीत झाले होते. शहरात यापूर्वी एका २० वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता, आता शहरात  मृत्यूची संख्या 2 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६२२ करोनाबाधित आहेत.
Corona-virus-nashik-district
जिल्ह्यात एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मृत १८ कोरोनाबाधित रुग्ण एकट्या मालेगावातील आहेत.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६२२ करोनाबाधित आहेत. मालेगाव ५०० पार झाला आहे.शनिवारी दिवसभरात मालेगावात -५८, नाशिक (कोणार्कनगर) -१ तर उसवड (चांदवड) येथे १ नवा करोनाबाधित आढळला. तसेच सिन्नर  बाधिताच्या संपर्कातील सर्व १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
नाशिक जिल्हा सद्यस्थिती

पॉझिटिव्ह - ६२२

नशिक शहर- ४५ (मृत्यू -२)

मालेगाव - ५०६

नाशिक ग्रामीण - ६२

जिल्ह्याबाहेरील- १९

नाशिक जिल्हा एकूण मृत्यू - २०