मुंबई: मुंबईहून पश्चिम बंगालसाठी 7 रेल्वेगाड्यांची परवानगी रेल्वेने मागितली आहे. अद्याप ती मिळालेली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माझी विनंती आहे की त्यांनी ही परवानगी त्वरित द्यावी. त्यामुळे श्रमिकांना पायी प्रवास करावा लागणार नाही.
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी ही ममता दिदींशी चर्चा करून परवानगी मिळवावी अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.