त्र्यंबकेश्र्वर/प्रतिनिधी : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर सुपूर्त करण्यात आले,यावेळी पोलीस उपनिरीक्षक किशोर कर्पे,पो.हवलदार आप्पासाहेब काकड यांचेकडे मास्क व धुळे जिल्हा ग्रामीण पोलीस यांना 300 सॅनिटायझर बॉटल पाठविण्यात आल्या .
कोरोना संकटकाळात रुग्णांची खरी सेवा कोणी करत असेल तर डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ आणि इतक्याच खंबीरपणे पोलीस आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहे.त्यामुळे कोरोनाशी थेट दोन हात करणाऱ्या खऱ्या वॉरियर्सला बळ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याच्याप्रती आपली ही जबाबदारी आहे. या उद्देशाने शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मनोज काण्णव यांचेतर्फे हे साहित्य देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, विजय गांगुर्डे, संतोष नाना पाटील, संदीप कुलकर्णी, जितेंद्र झोले,विजय वसंत गांगुर्डे, महेंद्र देवरे, कौस्तुभ कुलकर्णी, दीपक परदेशी, ज्ञानेश्वर गुंड, प्रवीण शिरसाठ, स्वप्निल बागडे, अब्दुल मन्सुरी,उल्हासबाबा तुंगार, देविदास गोडे, अनिलशेठ कासट, अनिलशेठ काळे, वसंतराव भोसले,राजेंद्र भोसले, परशुराम पाडेकर, रतीश दशपुत्रे, विवेक खैरनार, निवृत्ती झोले,देविदास जोशी, कडलग सर, संकेत साबळे, मयूर थेटे आदी उपस्थित होते.