- भोईवाड्यातील श्री साई मंदिर ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 51हजार रुपयांचा धनादेश - TheAnchor

Breaking

May 11, 2020

भोईवाड्यातील श्री साई मंदिर ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 51हजार रुपयांचा धनादेश

मुंबई : करोनाच्याविरोधात लढा देत महाराष्ट्र सरकार राज्यातील  जनतेच्या  आरोग्याची काळजी घेत आहे. त्यात सामाजिक दायित्व म्हणून भोईवाडा येथील श्री साईनाथ  मंदिर ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 51हजार रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला.
Cm-relief-fund-covid-19
फोटो: फाईल 
परळ भोईवाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रिसेंट बे कॉम्प्लेक्सजवळ सुमारे 70 वर्षाचे जुने साई मंदिर असून साईभक्त श्री समर्थ सीताराम महाराज यांनी या साई मंदिराची स्थापना केली होती. या मंदिराचे कार्य करणाऱ्या श्री साईनाथ मंदिर ट्रस्टची नोंदणी 1963 साली राज्य धर्मदाय आयुक्त  कार्यालयात करण्यात आलेली आहे. श्रद्धावान देणगीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या  शिधारुपी अन्नधान्य वस्तूमधून  दत्त जयंती आणि रामनवमी उत्सवात होणाऱ्या साई भंडाराचा लाभ दरवर्षी हजारो भाविक  घेतात.  
Cm-relif-fund-corona-virus
लॉकडाऊनमुळे रामनवमीचा साई भंडारा रद्द करावा लागला. परोपकाराची शिकवण बाबांनी दिलेली असल्याने  संस्थेने या संकटकाळात मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजार रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला. आज सोमवारी श्री साई चरणी धनादेश अर्पण करून ट्रस्ट पदाधिकारी  तो  मंगळवारी पुढील कार्यवाहीसाठी बँकेत जमा करणार आहेत .
Cm,-relif-fund-corona-virus