नाशिक: भारतात सोने - चांदी आयातीचे धोरण ठरवून देशांतर्गत बाजारपेठेत या मौल्यवान धातूचा बाजारभाव ठरविण्यात महत्वपूर्ण भुमीका बजावणाऱ्या इंडीया बुलीयन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य संचालकपदी दि नाशिक सराफ असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष चेतन राजापूरकर यांची निवड झाली आहे. या केंद्रीय संस्थेवर राजापूरकर यांची निवड झाल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आयबीजेएचे केंद्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी नुकतेच या संदर्भातील नियुक्तीचे पत्र राजापूरकर यांना दिले आहे. तर त्यांच्या या निवडीचे आयबीजेएचे महाराष्ट्रचे अध्यक्ष हरेश केवलरामानी यांनी स्वागत केले आहे. भारतात सोन्या-चांदीच्या बाजार भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सन १९१९ साली स्थापन झालेल्या या देशव्यापी संस्थेवर नाशिकच्या चेतन राजापूरकर यांच्या रूपाने तब्बल शंभर वर्षानंतर पहिल्यांदाच एक मराठी माणूस महाराष्ट्रातून नेतृत्व करणार असल्याने राजापूरकर यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.
किशोर वडनेेरे