- सावधान! कोरोनाचा विळखा वाढतोय; घरीच रहा सुरक्षित रहा - TheAnchor

Breaking

May 6, 2020

सावधान! कोरोनाचा विळखा वाढतोय; घरीच रहा सुरक्षित रहा

नाशिक/ प्रतिनिधी: शहरासह जिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५०३ बाधीत रुग्ण आढळले आहेत तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १४ जण मालेगाव तर १ शहरातील आहे. तसेच ३३ जण बरे झाले आहे. अद्याप ४५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, शहरात २२ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे घरीच रहा सुरक्षित रहा असं आवाहन सातत्याने शासन-प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Covid-19-corona-virus
फोटो: उदय रांजणगावकर

नाशिक महापालिका क्षेत्र

पॉझिटीव्ह :२२
म्रुत्यु : ०१
बरे झालेले :३

नाशिक ग्रामीण

पॉझिटीव्ह: ५२
म्रुत्यु :00
बरे झालेले :२

मालेगाव महापालिका क्षेत्र

पॉझिटीव्ह :४१३
म्रुत्यु : १४
बरे झालेले :२८


नाशिक जिल्ह्या बाहेरील

पॉझिटीव्ह :१६
म्रुत्यु : ००
बरे झालेले :००

नाशिक जिल्ह्यात  एकुण

पॉझिटीव्ह :५०३
म्रुत्यु :१५
बरे झालेले :३३
उपचार सुरु असलेले रूग्ण :४५५