नाशिक/ प्रतिनिधी: शहरासह जिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६२२ बाधीत रुग्ण आढळले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १८ जण मालेगाव तर १ शहरातील आहे. तसेच ४६ जण बरे झाले आहे. अद्याप ५०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, शहरात ४४ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे घरीच रहा सुरक्षित रहा असं आवाहन सातत्याने शासन-प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
![]() |
फोटो: फाईल |
मालेगावात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आता थेट जिल्हाधिकारी सूरज मांढरे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे तर शहरातील म्हणजेच महापालिका हद्दीतील जबाबदारी नाशिक मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यावर आहे.
जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
नाशिक ग्रामीण - ६१ आहे. ( नाशिक तालुका -8, चांदवड-3, सिन्नर-5, दिंडोरी-1, निफाड-5, नांदगाव-2, येवला-25, सटाणा-1, मालेगाव ग्रामीण-11) तर मालेगाव महापालिका - एकूण बाधित - 497 आहे. जिल्ह्याबाहेरील अन्य पॉझिटिव्ह-19 आहे.