गेल्या काही दिवसापासून कोरोना संकटाने आम्ही सर्व भयभीत झालेले आहोत. आम्ही आधीही मतलबी होतो. आताही आहोत, पुढे ही रहाणार आहोत.तरीही आमच्या भयभीत मानसिकतेमुळे आम्ही खुप काळजी घेत आहोत. हे मला मान्य आहे. त्याचा अर्थ आम्ही केवळ आम्हीच सुरक्षित आहोत, हा भ्रम आपल्या मनातून्ं काढून टाका..सर्व प्रथम आम्ही या विषाणु सोबत जीवन जगायला शिकावच लागेल. आज जगभरातील किमान आठ दहा देश यावर उपाय म्हणजेच औषध सापडल्याचा दावा करताय. पण अजून तरी कुणाला यश मिळाल नसल्याच खात्रीने सांगता येईल. तेव्हा आपल्याला फक्त आपली काळजी घेणे महत्वाचे आहे.
![]() |
फोटो: फाईल |
म्हणजे नेमके करायचे काय?
आपण फक्त तीन बाबतीत खुप सावधान रहायच.पहिल म्हणजे घरातून बाहेर पडताना आपल्या तोंडाला मास्क,रुमाल बांधूनच निघायच.यातुन एकच लक्ष्यात घ्या.आपण उघड्यावर,शिकायच, खोकलायाच नाही. हेच सर्वानी करायच. म्हणजे आम्ही पन्नास टक्के सुरक्षित झालो. दुसरे म्हणजे बाहेर पडल्यावर कुठेही हात लावायचा नाही. तशी वेळ आली कि हातावर सनिटायजर लावा किवा हाथ धुवा,मगच इतरांना स्पर्श करा. तिसरा उपाय म्हणजे, बाहेरुन घरी आल्यावर घरातील कुठल्याही वस्तूला स्पर्श करायचा नाही.सर्व प्रथम आपल्या हातावर सनिटायजर लावा. आपले कपडे वेगळे ठेवण्याची व्यवस्था करा किवा ते सरळ साबणाच्या पाण्यात भिजायला टाका.स्वच्छ हात पाय धुवा किवा अंघोळ करा.
सर्वात मह्त्वाचे म्हणजे आपण जर बाहेर फिरत असाल,दवाखान्यात जात असाल तर आपण कुणाच्याच घरी जावू नका आणि आपल्या कुटुंबाच्या सदस्यांपासून थोडे दुर रहा हे काही कालच करायच आहे असे नाही, कारण जसे अन्य भयंकर विषाणु आता आपल्याला त्रास देत नाही. तसेच हाही काळ आपल्या अंगवळणी होइल, तोपर्यंत काळजी घेणे बेस्ट!हे तीन उपाय आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात. हे बघा सार्स,मार्स,एबोला,स्वाइन फ्लू,बर्ड फ्लू,यातील कुठल्याही विषाणूवर अजुन तरी लस वा औषध निघालेले नाही.तरीही आम्ही आज ही सुरक्षित आहोत. थोडीशी काळजी घेतली कि आपली सुरक्षितता वाढते.हे अनुभवाने सिद्ध झालेलं आहे.आता आपल्याला या तयारीला लागले पाहिजे.
आणखी एक महत्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवा.आज आपल्याकडे एखादी व्यक्ती संक्रमित झाली वा त्याच्या संपर्कात आली.तर हा व्हायरस आपल्याला कधीच स्पर्श करणार नाही.असे वागू नका.या दिवसात आम्ही गल्ली गल्लीत दगड,काठ्या टाकुन जो मूर्खपणा केलाय तसा करु नका.अहो ए सिंम्टोमटिक म्हणजे लक्षणाशिवाय तुम्ही संसर्गीत म्हणजेच कोरोना पॉझिटीव्ह असता.तेव्हा सावधानता बाळगा,पण फाजिल अधिकार वापरण्याचा व खुप समाज हितेशी होण्याचा प्रयत्न करु नका.कारण आता पर्यंत जेवढे लोक क्वारंटीन होममध्ये ठेवले क्वचित ते पॉझिटीव्ह झालेत आणि आता या संक्रमणातून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. माझं लिखाण कदाचीत तुमच्या मनाला पटणार नाही. अशा वेळी फक्त एक विचार करा,तो म्हणजे आम्ही स्वत: कोविड़-कोरोना पॉझिटीव्ह झालो तर जी समाजिक वागणूक आपल्याला व आपल्या कुटुंबाला अपेक्षीत आहे.ती आपण इतरांना देतो का?