मुंबई : करोनाच्या संकटग्रस्त काळात मुंबई शहरांतील विविध भागात मदतकार्य करणाऱ्या भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांना एक लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यात आला आहे. भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजींदर सिंग तिवाना यांच्या माध्यमातून ही विमा पॉलिसी काढण्यात आली आहे.
![]() |
भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजींदर सिंग |
कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर, नर्स, पोलीस आदी प्रत्यक्ष झोकून काम करत आहेत. तसेच लॉकडाउनचे पालन करणाऱ्या जनतेला आज तेवढीच मदतीची गरज आहे. अशा प्रसंगी गल्लीबोळात जाऊन मदतकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आरोग्य विमा उतरविण्यात आला आहे.
सुरुवातीला 20 जणांचा विमा उतरवण्यात आला आहे. यानंतर अन्य कार्यकर्त्याचे विमा काढण्यात येतील, अशी माहिती तिवाना यांनी दिली.