दिल्ली: देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि अन्य लोकांना आपल्या राज्यात घरी पोहोचता यावे यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार भारतीय रेल्वेने विशेष श्रमिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता.
![]() |
फोटो:फाईल |
दि.11 मे 2020 आज देशभरातील विविध राज्यांमधून एकूण 468 “श्रमिक विशेष” गाड्या सोडण्यात आल्या असून यापैकी 363 गाड्या आपल्या नियोजितस्थानी पोहोचल्या असून 105 गाड्या पोहचण्याच्या मार्गावर आहेत.
या 363 गाड्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत., यामध्ये आंध्र प्रदेश (1 गाडी ), बिहार (100 गाड्या), हिमाचल प्रदेश (1 गाडी ), झारखंड (२२ गाड्या), मध्य प्रदेश (30 गाड्या), महाराष्ट्र (3 गाड्या), ओडिशा (25 गाड्या ), राजस्थान (4 गाड्या), तेलंगणा (२ गाड्या), उत्तर प्रदेश (172 गाड्या), पश्चिम बंगाल (२ गाड्या), तामिळनाडू (१ गाडी )यांचा समावेश आहे.या गाड्यांमधून तिरूचिरापल्ली, तितलागड, बरौनी, खांडवा, जगन्नाथपूर,
खुर्दारोड, प्रयागराज, छपरा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनौ, जौनपूर, हतिया, बस्ती, कटिहार, दानापूर, मुझफ्फरपूर, सहरसा इत्यादी गावांमधल्या श्रमिकांना त्यांच्या मूळगावी पोहोचवण्यात आले.या श्रमिक रेल्वे गाड्यांमधून एकावेळी जास्तीत जास्त 1200 प्रवाशांना पाठवण्यात येते. सामाजिक अंतर राखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येते. तसेच या सर्व प्रवाशांची गाडी सुटण्यापूर्वी आरोग्य तपासणी केली जाते. तसेच प्रवासाच्या काळात सर्वांना मोफत भोजन आणि पाणी देण्यात येते.