मालेगाव: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) लॅबमधून दररोज 300 टेस्टींग रिपोर्ट 24 तासात मिळणार आहेत, तसेच धुळ्यात नवीन 450 प्रतिदिन अहवाल देणारी लॅब पूर्ण क्षमतेने येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे. त्यामुळे मालेगावचे टेस्टिंग रिपोर्ट प्रलंबित राहण्याचा विषय आता मार्गी लागला असून रुग्णांचे निदान व उपचार वेळेत मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
 |
फोटो: फाईल
खाजगी रुग्णालये जरी सुरु झाले असले तरी, त्यात केवळ ओपीडी कार्यान्वित आहेत. आयपीडी अजून सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून नियमित अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी हजर होत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले.
|