- वाढदिवशी आकाश पगार अडकले जागृती देवरे यांच्या लग्न बेडीत; मान्यवरांनी दिले नववधूवरांना आशीर्वाद - TheAnchor

Breaking

September 22, 2020

वाढदिवशी आकाश पगार अडकले जागृती देवरे यांच्या लग्न बेडीत; मान्यवरांनी दिले नववधूवरांना आशीर्वाद

नाशिक|राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचा मुलगा आकाश व मुख्याध्यापक दिलीपराव देवरे यांची कन्या जागृती यांचा विवाह मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन ॲानलाईन पद्धतीने हजारो नेटकऱ्यांनी या विवाहास हजेरी लावत वधुवरांना आशीर्वाद दिले.
Aakash-Pagar-stuck-in-his-wedding-on-his-birthday-The-dignitaries-gave-blessings-to-the-bride-and-groom
नाशिक येथील हाॅटेल एक्सप्रेस इन येथे संपन्न झालेल्या या विवाहास पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील, गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, अभिनेता अभिजीत खांडकेकर, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, माजी मंत्री विनायकदादा पाटील, बापुसाहेब भुजबळ, आमदार हेमंतराव टकले, आ.दिलीपराव बनकर, आ.नितीनभाऊ पवार, आ.सरोजताई आहिरे, आ.हिरामण खोसकर, आ.सीमाताई हिरे, आ.दिलीपजी बोरसे, माजी आमदार दिपीकाताई चव्हाण, संजयनाना चव्हाण, जयंतराव जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ.सयाजीराव गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथजी शिंदे, एम.ई.टी.शिक्षण संस्थेच्या संचालिका डाॅ.शेफालीताई भुजबळ, संचालक दिलापराव खैरे, मविप्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषारदादा शेवाळे, संचालक नानासाहेब महाले, डाॅ.जयंतराव पवार, डाॅ.प्रशांत देवरे, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र बापु पाटील, संदिप गुळवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, यशवंत शिरसाठ, नुतन आहेर, भास्कर भगरे, डाॅ.योगेश गोसावी, सोमनाथ खातळे, विजय पवार, मीडिया सेलचे प्रफुल्ल पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आकाश पगार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन साध्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाप्रसंगी केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.