- भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द: प्रेरणा बलकवडे - TheAnchor

Breaking

September 18, 2020

भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द: प्रेरणा बलकवडे

नाशिक|नाशिक जिल्ह्यातील झेप फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्य मार्फत पुणे येथील जगदंबा ऑटो कोम्पोनंटस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नाशिक जिल्ह्यातील २५ युवकांस रोजगार उपलब्ध झाला आहे. भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि झेप भरारी फाउंडेशनच्या सौ.प्रेरणा बलकवडे यांनी केले. 
Committed-to-provide-employment-to-the-youth-of-Bhagur-Panchkrushi-Prerna-Balkwade

झेप भरारी फाउंडेशन समाजातील सर्वच घटकांसाठी काम करत आहे, कोरोना महामारीमुळे आज अनेक युवक बेरोजगारीच्या विळख्यात सापडले आहे.  शिक्षित तरुणांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहिलेला असून अशा कठीण कालावधीत रोजगार मेळावे घेऊन युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेला राष्ट्रवादी महिला
 काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व झेप फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.प्रेरणा बलकवडे यांनी मुहूर्तरूप दिले, त्यासाठी वर्चुअल रोजगार मेळावा भरवून त्यांनी पहिल्या टप्प्यात युवकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित नोकरी अश्याप्रकारे  २५ मुलांसाठी नोकरीची व्यवस्था करून दिली. त्यासोबतच त्याच तरुणांची तिथे राहण्याची व जेवण्याचे व्यवस्थेचे आयोजन देखील पूर्णपणे झेप फाउंडेशनने करून दिले.

शैक्षणिक गुणवत्तेनुसार नोकरी

झेप फाउंडेशन हे समाजसेवेसाठी उभी राहिलेली संस्था असून  अश्याच प्रकारे मेळावे घेऊन युवकांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते नुसार नोकरीची संधी उपलब्ध करून देणेसाठी आम्ही कटिबद्ध असून, सध्याच्या टप्प्यात भगूर व पंचक्रोशीतील युवकांस रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून रोजगार मेळाव्याचा पुढचा टप्पा हा येत्या २० सप्टेबर रोजी होणार असून जास्तीत जास्त युवकांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. प्रेरणा बलकवडे यांनी केले.