- औरंगाबाद जिल्ह्यात 23681 कोरोनामुक्त, 5954 रुग्णांवर उपचार सुरू - TheAnchor

Breaking

September 21, 2020

औरंगाबाद जिल्ह्यात 23681 कोरोनामुक्त, 5954 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद| विशेष प्रतिनिधी| जिल्ह्यात आज 404 जणांना (मनपा 255,  ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 23681 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 323 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30491 झाली आहे. आजपर्यंत एकूण 856 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5954 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
In-the-district-23681-corona-free-5954-patients-are-undergoing-treatment
फोटो: फाईल
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पाइँटवर 59, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 97 आणि ग्रामीण भागात 64 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या) आहे.

ग्रामीण (101)

साशेगाव (2), गणेश चौक वाळूज (1), कमलापूर रोड वाळूज (1), संत कॉलनी , वाळूज (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1),ओम साई नगर , रांजणगाव (1), बजाजनगर, रांजणगाव (1), सारा गौरव, फुलंब्री (1), बिडकीन (2), शिवना (1), भवानी नगर, बजाज नगर (1), लासूर स्टेशन (3), वीरगड, लासूर स्टेशन जवळ (1), संतोषी माता कॉलनी, कन्नड (1), शिवाजी नगर, कन्नड (1), यशवंत नगर, पैठण (2), भवानी नगर, पैठण (1), राम नगर, पैठण (1), महावीर चौक, पैठण (1), लक्ष्मी नगर, पैठण (1), औरंगाबाद (30), फुलंब्री (8), गंगापूर (8), कन्नड (6), वैजापूर (3),पैठण (7), सोयगाव (2) खतखेडा (4), मोहरा, कन्नड (1), आडगाव, कन्नड (1), गेवराई, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (2), पानवडोद (1), उंडणगाव (1), चित्तेगाव (1)

मनपा (66)

घाटी परिसर (1),पैठण गेट (1),मयूर पार्क (1),एन सहा सिडको (5), उल्का नगरी (1), जगदीश नगर (1), एकता नगर (1),माऊली नगर (2), बन्सीलाल नगर (2), सोनार गल्ली (2), बालाजी नगर (1), जैन नगर (1), सिंधी कॉलनी (1), मोची गल्ली (1), कोकणवाडी (1), हर्सूल (2), गरवारे कम्यूनिटी सेंटर (1), साईनगर एन सहा सिडको (1), सूरेवाडी (1), विठ्ठल नगर (1), शास्त्री नगर (1), विजयंत नगर (1), न्यू गणेश नगर(2), नामांतर कॉलनी (1), हडको (2), अयप्पा मंदिराजवळ, बीड बाय पास (1),  नाईक नगर , बीड बाय पास (2), गारखेडा  (2), व्हिनस सोसायटी, बीड बाय पास (1), तुळजाभवानी शाळेजवळ, मुकुंदवाडी (1), एन चार सिडको (1), जिल्हा सामान्य रुग्णालय (1), सातारा परिसर (1), नंदनवन कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (2), देवगिरी कॉलनी (1), अहिंसा नगर (1) सौजन्य नगर (1), एन दोन सिडको (2), बेगमपुरा (1), नारळीबाग (1) सुरेवाडी (1), एन अकरा हडको (2), बीड बायपास (2), शिवनेरी कॉलनी (1), भक्ती नगर, पिसादेवी रोड (1), बीएसएनएल कॉलनी (1), यशवंत नगर, बीड बायपास (1), नागेश्वरवाडी (1) माया नगर (1)

सिटी एंट्री पॉइंट (59) 

गादिया विहार (3), बजाज नगर (3), वाळूज (1), कांचन वाडी (6),वंजरवाडी , माळीवाडा (3), स्वामी विवेकानंद नगर (4), चौधरी कॉलनी (1), मुकुंदवाडी (2), म्हाडा कॉलनी, तोरणा गड नगर (2), गजानन नगर (1), एसआरपीएफ कॅम्प सातारा (1), सातारा (2), पैठण (2), इटखेडा (1), नक्षत्रवाडी (3), चित्तेगाव (1), बिडकीन (1), त्रिवेणी नगर (1), सोनखेड लोहा (1), बजाज नगर (4), वाळूज महानगर (2), पिसादेवी (1), फुलंब्री (1), जय भवानी नगर (1), एन पाच बजरंग चौक (1), वानखेडे नगर (5), मयूर पार्क (1), एन नऊ पवन नगर (4)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू 

घाटीत पुंडलिक नगरातील 65 वर्षीय पुरूष, इंदिरा नगर, वैजापुरातील 55 वर्षीय स्त्री, सादात मोहल्ला, पैठण येथील 70 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांत शिवाजी नगर, सिल्लोड येथील 55 वर्षीय पुरूष व भगतसिंग नगरातील 73 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.