_*🌹🌳"काळ कोरोना"🌳🌹*_
***************************
पाहुणा म्हणुन उभा,
दिसता लोकांचे दारी !
लोक म्हणती कोरोना,
आलाय आमचे घरी !!
जागरुकता लोकांची,
जन माणसाच्या दारा !
माझे मन म्हणे मला,
घरी थांबलेला बरा !!
सुप्त फिरती कोरोना,
रोग जनमानसात !
जीव घेणं बळ आहे,
कोरोनाच्या विषाणूत !!
दोन हात करु आता,
जागतिक संकटाशी !
साथरोग आळा घालु,
नियम घालु स्वतःशी !!
अर्थचक्र सुरु ठेऊ,
युद्ध करु कोरोनाशी !
एकत्र लढु आपण,
कोरोनाच्या विषाणूशी !!
कोरोनाशी लढन्याचे,
बळ येई देहामध्ये !
कोरोनाशी लढण्यास,
तयार असती योद्धे !!
कोरोना मुक्त भारत,
व्हावा हीच तळमळ !
कोरोना लढण्या करु,
जनतेची चळवळ !!
सर्दी पडसे खोकला,
अंगी खूप ताप येता !
लक्षणे ही कोरोनाची,
उपचार वेळी घेता !!
कोरोना विषाणू करी,
फुफ्फुसावरती हल्ला !
रक्षण्या जीव तुमचा,
घ्यावा डॉक्टरांचा सल्ला !!
काळजी घ्यावी आता,
तुम्ही साऱ्या कुटुंबाची !
सजगता आणू स्वतः,
कोरोनाच्या बचावाची !!
पण सांगु जनतेला,
जीव रक्षन्याचा ध्यास !
मनी जोडून माणसे,
नको पैसाचा हव्यास !!
फुफ्फुसाची सेवा करु,
न होण्या कोरोना त्यास !
चालू ठेऊ जनतेच्या,
हृदयाचा शासोश्वास !!
🌹🌹🌳🌳🌲🌳🌳🌹🌹
_*कवी:- जी.पी.खैरनार, नाशिक*_
_*९४२१५११७३७ /*_
*_७०८३२३४०२१_*