🌹🌲🌳"माझी शाळा" 🌳🌲🌹
*******************************
![]() |
फोटो:जी पी खैरनार |
लहानपणीची शाळा आमची,खुप छान होती हो !माती कौलारु छत होतं,अंगणात घाण नव्हती हो !!शाळा जरी साधी होती,गुरुजी आमचे होते हुशार !साधी भोळी राहणी त्यांची,उच्च होते त्यांचे विचार !!शाळेत येणारी सारी मुलं,कुटुंबातील वाटायची हो !दुपारी जेवनाच्या सुट्टीत,एकत्र सारे खदाडायचो हो !!गुरुजी दारात दिसता क्षणी,भीती खुप वाटायची हो !नवीन पाढा शिकविणार म्हणून,गुरुजी माघे बोंबलायचो हो !!दूर अंतरी शाळा होती,तरी पाय थकले नाही हो !पायात चप्पल नव्हती तरी,उन्हाचा चटका बसला नाही हो !!काळ्या फळ्यावर खडूने लिहुन,गुरुजीचे शिकवणे थांबले नाही हो !फुटकी खापरी पाटी असता,अभ्यास थांबला नाही हो !!बापाच्या फाटक्या कोपरीत,भाकर बांधून आणायचो हो !बिन तेलाचा मिरची ठेचा,टोचा मारुन खायचो हो !!कबड्डी खो- खो हुतुतू भारी,शाळेच्या अंगणी चाले खेळ !मित्र सारे टपोरी होती,उनाडक्या करत जातसे वेळ !!शेंबड्या गंपुचा अवतार पाहून,पोरं सारी हसायचे हो !वस्तीवरची म्हातारी माणसं,गंमत पाहण्या यायची हो !!गुरुजींच्या शिस्तीचा धाक आता,शाळेत दिसत नाही हो !शाळा शिकण्यास पैसे देऊन,आनंद मिळत नाही हो !!चुक होता वटारता डोळे,भीती पोरांना वाटायची हो !चुकीचे वागणे गुरुजी आमचे,खपवून घेत नसायचे हो !!विद्यार्थ्यांना छडी मारण्या,भीती खुप वाटते हो !शिक्षा न करता विद्यार्थी घडणे,अवघड आता झाले हो !!शेण - सड्याचे अंगण होते,बसण्यास बाकडे नव्हते हो !जमिनीवर बस्तान घालून मांडी,बे-चे पाढे म्हणायचो हो !!पूर्वीच्या गुरुजींचा दरारा आता,पाहण्या पुन्हा मिळेल काय !करारी बाण्याचे शिक्षक आता,शाळेमध्ये दिसतील काय !!पाय वाटेने शाळेत जाण्याची,आता सजा बंद झाली हो !तप्त उन्हात शाळेत जाण्याची,आता मजाच निघुन गेली हो !!मोठं मोठाली दफ्तर आमच्या,पाठी तेव्हा नव्हती हो !बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन,विद्यार्थी साहेब झाले हो !!🌹🌹🌳🌳🌹🌹🌳🌳🌹🌹कवी:- जी.पी.खैरनार, नाशिक९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१