पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची बदली मुंबईत झाली असून नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दिपक पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षकपदी प्रताप दिघावकर यांची नियुक्ती झाली आहे असून छेरिंग दोरजे यांची मुंबईत आयजी म्हणून बदली करण्यात आहे.
गणेशोत्सवानंतर गृहविभागाकडून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. राज्यात एकूण ४५ जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. आज या बदल्याचे आदेश निघाले आहे. मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक पोलिस आयुुुक्तपदी दिपक पांडे यांंची वर्णी लागली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नवी मुंबई आयुक्तपदी बिपीन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालक म्हणून रजनीश सेठ यांची नियुक्ती झाली आहे.