- आपण माणूस म्हणून कसे आहोत याला ही महत्व असते:उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी - TheAnchor

Breaking

September 21, 2020

आपण माणूस म्हणून कसे आहोत याला ही महत्व असते:उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी

नाशिक|आपण व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक नंतर आहोत. आधी माणूस आहोत. माणूस म्हणून कसे आहोत हे विशेष महत्वाचे असते असे प्रतिपादन उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यानी केले.
  
This-is-how-we-are-as-human-beings-Upadhyay-pp-Praveen-Rishiji

ते पुढे म्हणाले की, श्रेष्ठ लोकांसोबत जा श्रेष्ठ व्हा आणि इतरांना श्रेष्ठ बनवा, यशस्वी लोकांनाच आठवावे, कोणाकडून प्रशिक्षण घ्यावे, योग्य गुरु निवडावा जो तुमच्या चुका माफ करणार नाही सुधारून घेईल, व्हिजन क्लिअर असावे, सहयोग देणे आणि घेण्यामुळे व्यक्ती समर्थ बनतो. या पाच सूत्रामुळे व्यक्ती यशस्वी होतो आणि यशस्वी माणूस यशस्वी उद्योजक निश्चित होतो. सहयोग घेण्याची कला मधमाशीकडून शिका स्वतः श्रेष्ठ बना इतरांना श्रेष्ठ बनवा. रस्त्यावर चालणारे बनू नका रस्ता निर्माण करणारे बना असे सांगून उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांनी शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांची उदाहरणाद्वारे दिले.    

सुरवातीला मंत्राचा पाठ केला.  महाराष्ट्र चेंबरतर्फे आयोजित यशस्वी व्यक्ती किंवा यशस्वी व्यावसायिक होऊ इच्छिता ? याविषयावर मार्गदर्शन करतांना यशस्वी होण्याचे ५ सूत्र गुरुजींनी सांगितले.   
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचा ९३ वा  स्थापना दिनानिमित्त एम. एल. डहाणूकर व्याख्यानमालेतील ६ वे व्याख्यान शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३.४५ वाजता उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचे आपण एक यशस्वी व्यक्ती किंवा यशस्वी व्यावसायिक होऊ इच्छिता ? याविषयावर झूम ऍपवर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा उपस्थित होते. 

सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाराष्ट्र चेंबरच्या ९३ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र चेंबरचे संस्थापकएम. एन. डहाणूकर  त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. शेठ वालचंद यांनी महाराष्ट्र चेंबरची स्थापना केली. त्यांच्या स्मरणार्थ वालचंद व्याख्यानमाला सुरु केली तसेच संस्थापकएम. एल. डहाणूकर  यांच्यास्मरणार्थ यांच्या डहाणूकर व्याख्यानमाला सुरु केली.  उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचे आज ६ वे व्याख्यानआयोजित केल्याचे सांगितले. आजचा विषय खूप  महत्वाचा आहे. आपण व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक नंतर आहोत. आधी माणूस आहोत. माणूस म्हणून कसे आहोत हे विशेष महत्वाचे असते. कोरोना काळात आपण जगत आहोत. अनेक विपरीत अनुभव माणसांचे आले आहेत. डाॅक्टरांना मारहाण करणारे रुग्ण, पिळवणूक करणारी मंडळी, सर्वस्व विसरून लढणारे कोरोना योद्धे, वगैरे वगैरे. यात माणूस दिसला की आपण नतमस्तक होतो. चांगला माणूस हा खरा परिचय असतो.  "परी अंतरी सज्जना निववावे " असे रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक यात सांगितले आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरी म्हणजे मनात एक सज्जन रहात असतो व त्याचे सदैव समाधान करावे असे ते सांगतात. म्हणजेच चांगला माणूस व्हा हेच सांगत आहेत. 

सध्याच्या महामारीविरूध्द लढण्याच्या कसोटीच्या काळात हा विषय मला आधिक महत्वपूर्ण  वाटतो. त्यावर आपल्या सखोल अभ्यास, चिंतन आणि पावित्र्य यासह मार्गदर्शन करण्यासाठी मुनिश्री यांस निमंत्रित केले आहे. त्यांचे विचार, मार्गदर्शन व उपदेश आपल्याला नवी दृष्टी देईल असा विश्वास वाटतो असे मंडलेचा म्हणाले. श्री. अशोक पगारिया यांनी उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.  ललित गांधी यांनी मानले. उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, सौ. शुभांगी तिरोडकर, संदेश राऊळ, सौ. सोनल दगडे,समीर दुधगांवकर, प्रमोद शहा,  यांच्यासह अनेकांनी प्रश्न विचारले व गुरुजींनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली.   यावेळी मनिष पाटील यांनी उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांची कार्यशाळेला उपस्थित होते त्यापासून त्यांना झालेला फायदा थोडक्यात सांगितले. मनीष पाटील (पुणे) स्वतःची स्वतःला कशी ओळख करून द्यायची मनशांती कशी लाभली हे सांगितले. 

महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, अनिलकुमार लोढा, गौतम ठाकूर, उमेश दाशरथी, सौ. शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, नाशिक शाखा चेअरमन संजय दादलिका, सचिन शहा, सरकार्यवाह सागर नागरे, सचिव चंद्रकांत दीक्षित, विनी दत्ता, चेंबरचे कार्यकारिणी सदस्य, सभासद,  व्यापारी, उद्योजक कार्यक्रमास मोठ्या संख्येने ऑनलाईन झूम ऍपवर उपस्थित होते.