शिर्डी| भक्तांना मंदिरांचे कवाडे उघडे करून द्यावे म्हणून आज शिर्डी येथे अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करून आंदोलन करण्यात आले. सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडावीत व तमाम भक्तांना अनुयायांना धार्मिक विधी करण्यास ,दर्शन घेण्यासाठी मंदिरं खुली करावी अशी मागणी करण्यात आली.
कोरोना संक्रमण रोकण्याकरता संपूर्ण भारतात लॉक डाऊन करण्यात आले. नंतर हळूहळू कोरोना संक्रमनाशी लढा देत जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी केंद्रसरकारने अनेक आश्वासक पाऊले उचलली. देशातील सर्व राज्यांशी समन्वय साधून अनेक उद्योगधंदे टप्याटप्याने सुरू केलेत. आज देशभरात शिक्षण व्यवस्था सोडता सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली गेली.
आपआपल्या राज्याने आपल्या स्तरावर निर्णय घेण्याची मुभा केंद्रासारकरने दिली असे असतांना देखील महाराष्ट्र सरकार काही ठिकाणी दुजाभाव करत आहे. सर्वत्र सर्व सुरू असतांना फक्त धार्मिक स्थळेच उघडण्यास परवानगी दिली जात नसल्याने सर्व धर्मीयांचीच कुचंबणा करण्याचे महापाप ही महाविकास आघाडी करत असा आरोप करण्यात आला.
महाराष्ट्रात भक्तांना मंदिरांचे कवाडे उघडे करून द्यावे म्हणून आज शिर्डी येथे अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करून आंदोलन करण्यात आले. सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडावीत व तमाम भक्तांना अनुयायांना धार्मिक विधी करण्यास ,दर्शन घेण्यासाठी तसेच यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, राज्याच्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खा.डॉ.भारती पवार, सुधीरदास महंत, संजय महाराज धोंडगे,भाऊ महाराज, आचार्य जीनेंद्र जैन, फुरसुंगीकर महाराज, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष सचिन तांबे यांचेसह अनेक साधूसंतांनी या लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला.