- भुजबळ म्हणाले,नाथाभाऊंच्या येण्याने राष्ट्रवादीचे बळ वाढेल - TheAnchor

Breaking

October 21, 2020

भुजबळ म्हणाले,नाथाभाऊंच्या येण्याने राष्ट्रवादीचे बळ वाढेल

नाशिक|भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे.
Bhujbal-said-that-with-the-arrival-of-Natha-Bhau-the-strength-of-NCP-increased
फोटो:फाईल
एकनाथ खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत त्यांनी भाजपा या पक्षाला महाराष्ट्रात मोठे केले,विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे, राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते असे व्यक्तिमत्त्व जर पक्षात आले तर निश्चित पणे पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास देखील श्री भुजबळ यांनी व्यक्त केला.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्या वेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे आणि ही गोष्ट शरद पवार साहेबांना कळते त्यामुळे आम्ही सर्व जण नाथाभाऊंचे स्वागतच करतो असे मत श्री.भुजबळ यांनी व्यक्त केले.

एकनाथ खडसे यांनी जर त्यांच्या भूमिकेत बदल केला असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्यांना पटली असेल तर त्यांचे स्वागतच करावे लागेल त्यांच्यामुळे पक्षाला अधिक फायदा होणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.