नाशिक| राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त (१५ आक्टोबर) नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्ह्यात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान, रक्तदान आदीसह सामाजिक आणि जनजागृती पर उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिली.
ना. छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांनी कार्यालयात भेटण्यासाठी गर्दी न करता कोरोना संकट काळात रुग्णासाठी आणि नागरिकांसाठी सामाजिक आणि जनजागृती पर कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे "माझे कुटुंब माझी जबाबदारी”मोहामेतील कर्मचाऱ्यांना हॅंडग्लोज, मास्क वाटप करण्यात येणार आहे. त्यासोबत भव्य प्लाझमा दान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मालेगाव व नाशिक सिव्हील होस्पीटल येथे दि. १५ ते १८ ऑक्टोबरपर्यंत अनेक दानशूर कार्यकर्ते प्लाझमा दान करणार आहेत. कोरोनामुक्त झाला असाल तर आपण आजच आपली अँटीजेन टेस्ट सिव्हील हॅास्पीटल येथे करून या मोहीमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व आपल्याच कोरोना बाधीत बांधवांसाठी प्लाझमा दान करून मदत करावी.नाव नोंदणी मजला,राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे संपर्क करावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केले आहे.