- पावसामुळे कांद्यावरील संकट आणखी गडद; कांदा @५० ग्राहकांना दिलासा नाहीच! दर गगनाला भिडणार. - TheAnchor

Breaking

October 14, 2020

पावसामुळे कांद्यावरील संकट आणखी गडद; कांदा @५० ग्राहकांना दिलासा नाहीच! दर गगनाला भिडणार.

नाशिक| प्रतिनिधी| कांद्याचे दर वाढल्याने किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात असून कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. ठोक बाजारात कांद्याला कमाल ४३०० ते ४८०० प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अतिवृष्टीमुळे कांंदा आणि कांद्याचे बी सडल्याने कांद्याच्या उत्पादनावर त्यांचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे कांद्याची आवक घटली असून त्यातच पोळ कांद्याला बाजारात येण्यास अद्याप महिना भराचा कालावधी लागणार आहे, त्यामूळे कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने सलग पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ग्राहकांना ही दरवाढीतून दिलासा मिळणे सद्या अशक्य दिसते.

Crisis-on-onion-due-to-rains-even-darker-Onion-50-consumers-are-not-relief-onion-prize-will-touch-sky.

दक्षिणेकडे झालेली अतिवृष्टी आणि महाराष्ट्रात काही भागात झालेल्या परतीच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पोळ कांद्यावर संकट उभे राहिले आहे. शेतातील कांदा बी सडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यात जो थोडाफार कांदा विक्रीसाठी शेतात ठेवलेला होता तो कांदा ही सडाला असून लाल कांद्याच्या लागवडीला परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याची आवक घटली पुढील काळात आणखी आवक घटणार असून कांद्याचे दर आणखी वाढणार आहे. मुंबई, नाशिक सारख्या महानगरांमध्ये आताच चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५० रू. किलो दराने विकला जात आहे. ठोक बाजारात कांद्याचे भाव वाढले असून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल ४८०० रुपये इतका प्रति क्विंटल भाव मिळाला. आज लासलगावला ४४०६ क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. 

लासलगाव येथे आयकर विभागाचे छापे

दरम्यान आयकर विभागाने लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांच्या घर, कार्यालय आणि गोडावूनवर छापे घातले आहे. कांदा भाववाढीमुळे सरकारने निर्यातबंदी केली होती. त्यानंतर ही बाजारात कांद्याचे दर चढेच आहे. या अनुषंगाने आयकर विभागाकडून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


नवा कांदा येण्यास उशीर असल्याने कांदा दर वाढणार

हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नव्या कांद्याला त्याचा फटका बसणार आहे.  अतिवृष्टीमुळे दक्षिणेतील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा आणि लागवड केलेले बी सडले आहे. त्यामुळे लाल कांदा पिकाला येण्यास अद्याप महिना दिड महिना लागूू शकतो. 

संदीप भाबड, कांदा व्यापारी, वसई - विरार