औरंगाबाद| उत्तर प्रदेश येथील हाथरस युवती अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी इंडीया(आठवले) गटाच्या वतीने राज्याचे गृहमंञी अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मुकूंदवाडी येथील छञपती शिवाजी महाराज पुतळा येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
देशात आणि महाराष्ट्रात होणारे दलितांवरील अन्याय वाढत आहे. यापूर्वी बलात्कार अनेक घटना माञ सरकारने दूर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये लाख खंडाळा(ता.वैजापूर), खर्डा, जवखेडा, सोनई, नेवपूर, जालना, धोंदलगाव आदी ठिकाणी दलितांवर अन्यट्रक झाले आहेत. या पिडितांना न्याय मिळालेला नाही. हाथरस प्रकरणासह वरील खटले फास्ट ट्रॕक कोर्टामध्ये चालवावीत, अशी मागणी राज्याचे गृहमंञी अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष -अरविंद अवसरमोल, जिल्हा कार्याध्यक्ष- बाळकृष्ण इंगळे, मराठवाडा सचिव- दिलीप पाडमुख, जिल्हा उपाध्यक्ष- बी.एस.इंगोले, सतिश गायकवाड, अप्पाराव इंगोले, देवराज विर, आसाराम गायकवाड, बबन कदम, गजानन बागुल, अमोल नरवडे, गजानन निकाळजे, प्रशांत वाकळे, बंटी बनसोडे, सागर गायकवाड , सागर शिंदे, सौरभ भालेराव, गोपी शिंदे, रोहीत घायतिडक, सतिश वाकळे, मिलिंद खरात, संदीप खंडाळे, आनंद गायकवाड, मंगेश खंडाळे, तपसे मामा, विनोद पगारे, पप्पू पगडे, धम्मा कांबळे, शुभम साबळे, अमोल बोर्डे, राहुल चास्कवार, युवराज घोडके, संदीप नावकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.