- नुकसानग्रस्त शेत पिकांचे त्वरित पंचनामे करून सरसकट भरपाई द्या : खा.डॉ.भारती पवार - TheAnchor

Breaking

October 21, 2020

नुकसानग्रस्त शेत पिकांचे त्वरित पंचनामे करून सरसकट भरपाई द्या : खा.डॉ.भारती पवार

Give-full-compensation-to-the-affected-farmers-MP-Dr-Bharti-Pawar

नाशिक| जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असून कुठल्याही अटीशर्तीविना शेतपिकांचे पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खा. डॉ.भारती पवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आधीच कोरोना संक्रमनामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला त्यातच हे आस्मानी संकट ओढवल्याने  कांदा, भात, मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, टोमॅटो आदी पिकांचे तथा द्राक्षबागाचें मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.