- कोविड-१९: राष्ट्रीय मृत्यू दर १% पेक्षाही कमी आणण्याचे केंद्राचे राज्यांना उद्दिष्ट - TheAnchor

Breaking

October 21, 2020

कोविड-१९: राष्ट्रीय मृत्यू दर १% पेक्षाही कमी आणण्याचे केंद्राचे राज्यांना उद्दिष्ट

नवी दिल्ली| चाचण्याशोध आणि उपचार या त्रिसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणी बरोबरच वेळीच आणि योग्य उपचार यामुळे देशात मृत्यू दर सातत्याने घटत आहे. आज राष्ट्रीय मृत्यू दर 1.51% आहे.राष्ट्रीय मृत्यू दर 1% पेक्षाही कमी आणण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे केंद्र सरकारनेराज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना सांगितले आहे. 


KOVID-19-The-Center-aims-at-bringing-the-national-mortality-rate-to-less-than-1-percent
फोटो:फाईल


सध्या 
14 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर 1% पेक्षा कमी आहे. भारतात बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 67,95,103 आहे. बरे होणाऱ्यांच्या दररोजच्या मोठ्या संख्येमुळे बरे होण्या संदर्भातल्या राष्ट्रीय दरात सातत्याने वाढ होत असून हा दर वेगाने 89% जवळ पोहोचला आहे. (88.81%).


बरे झालेल्यांपैकी 77% संख्या 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातली आहे. नुकत्याच बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकले असून कर्नाटकमध्ये 8,500 जण बरे झाले आहेत तर महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यामध्ये ही संख्या 7,000 पेक्षा जास्त आहे. देशात गेल्या 24 तासात 54,044 नव्या रुग्णांची नोंद झाली.


यापैकी 78% रुग्ण दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात 8,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि केरळ या दोनही राज्यात 6,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 717 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 82% मृत्यू 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत. काल झालेल्या मृत्यूंपैकी 29% महाराष्ट्रात असून इथे 213 तर कर्नाटक मध्ये 66 मृत्यू झाले आहेत.